अहमदपूर येथे भाजपच्या वतीने चायना वस्तू जाळून चिनचा जाहीर निषेध…

बालाजी तोरणे अहमदपूर व चाकूर तालुका प्रतिनिधी.

चिनमध्ये उत्पादन होणाऱ्या वस्तू कोणीही खरेदी करू नये चायना वस्तूवर बहिष्कार टाकवा म्हणून भारतीय जनता पार्टी च्या वतीने माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली चिनी वस्तूंची होळी ‌करुण चिनचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

अहमदपूर शहरातील शिवाजी चौकात सकाळी अकरा वाजता भारतीय जनता पार्टी च्या वतीने चिन विरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात आली.सर्वप्रथम भारत चिन सिमेवर जे युद्ध झाले त्या युद्धात जे भारतीय जवान शहीद झाले त्या शुरविर‌ भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

तदनंतर चायना वस्तूंची होळी करून चिनचा निषेध करण्यात आला. सदरील आंदोलनात माजी मंत्री विनायकराव पाटील , माजी आमदार बब्रुवान खंदाडे, माजी सभापती अॅड.आर.डी.शेळके, विठ्ठलराव बोडके,विश्वाभंर शिंदे, भाजपचे तालुकाध्यक्ष रामभाऊ बेल्लाळे ,अॅड.अमित रेड्डी,ज्ञानोबा बडगिरे,लक्ष्मीकांत कासनाळे, कमलाकर पाटील, शिवराज पाटील, देवानंद मुळे, राजकुमार खंदाडे, गोविंदराव गिरी, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष महेश ढाकणे, चंद्रशेखर डांगे, धनराज गुट्टे,

डॉ सिद्धार्थकुमार सुर्यवंशी,राहूल शिवपुजे, श्रीकांत भुतडा, निखिल कासनाळे, श्रीकांत उपाध्याय, निळकंठ पाटील, शिवानंद भोसले,व्यंकटी जाभाडे,प्रताप शेळके , अशोक कासले,गफार पठाण,राम देवकाते, तुकाराम देवकाते, संजय मुसळे, पांडुरंग कांबळे, गजानन मुंडे, शंकर मुळे,विष्णु पौळ, वैभव बलुरे यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here