लोकप्रतिनिधी अधिनियम, १९५० व मतदार नोदणी नियमाच्‍या, १९६० अन्‍वये मतदार यादीतून नावे वगळण्‍याबात जाहीर नोटीस…

तेल्हारा – गोकुळ हिंगणकर

28 अकोट विधानसभा मतदार संघातील सर्व जनतेस सुचित करण्‍यात येते की, मा.भारत निवडणूक आयोगाकडून मतदारांच्‍या छायाचित्रासह मतदार यादी तयार करण्‍याचे निर्देश आहेत. त्‍यानूसार मतदार यादीत छायाचित्र नसलेल्‍या मतदाराकडून छायाचित्र प्राप्‍त करून ते मतदार यादीत अंतर्भूत करणे आवश्‍यक आहे.

त्‍याअनुषंगाने संबंधीत मतदाराच्‍या घरोघरी मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी बी एल ओ(BLO) यांचेव्‍दारे डिसेंबर 2019 ते मार्च 2021 या कालावधीत भेटी दिल्‍या असता मतदारयाद्यामध्‍ये छायाचित्र नसलेल्‍यांपैकी काही मतदार त्‍यांच्‍या मतदार यादीत नमूद असलेल्‍या निवासी पत्‍त्‍यावर राहत नसल्‍याचे निर्देशनास आले आहे.मतदार यादीतून छायाचित्र नसलेल्‍यांपैकी जे मतदार त्‍यांच्‍या मतदार यादीतून नमूद असलेल्‍या निवासी पत्‍त्‍यावर राहत नसल्‍याचे आढळून येत असल्‍यास,

लोकप्रतिनिधी अधिनियम , 1950 व मतदार नोदणी नियमाच्‍या, 1960 मधील तदतूद व मा.भारत निवडणूक आयोगाच्‍या मार्गदर्शक सूचनानूसार संबंधित मतदारांची नांवे मतदार यादीतून वगळण्‍याची कार्यवाही करण्‍यात येणार आहे. त्‍याअनुषंगाने मतदार यादीत फोटोनसलेले एकूण 7261. मतदारांची यादीही मतदार नोंदणी अधिकारी 28 अकोट. विधानसभा मतदार संघ, अकोट/तेल्हारा तहसिल कार्यालय,अकोला जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी यांचे कार्यालयात सर्व नागरीकांना पाहण्‍यास उपलब्‍ध करून देण्‍यात आलेली आहे.

तसेच ही यादी https://akola.gov.in/notice_category/announcements अकोला जिल्‍हयाच्‍या संकेतस्‍थळावर प्रसिध्‍द करण्‍यात आलेली आहे. ज्‍या मतदारांचे छायाचित्र मतदार यादीमध्‍ये नाहीत त्‍यांनी त्‍यांचे फोटो व सदरील यादीतील नावे वगळण्‍या बाबत आक्षेप असणा-या व्‍यक्‍तींनी त्‍यांची लेखी आक्षेप दिनांक 05/07/2021 पर्यंत संबंधित तहसिल कार्यालयात नोंदवावे.

संबंधीत हरकती किंवा आक्षेप वेळेत प्राप्‍त न झाल्‍यास लोकप्रतिनिधी अधिनियम, 1950 व मतदार नोदणी नियमाच्‍या, 1960 अन्‍वये व मा.भारत निवडणूक आयोगाच्‍या मार्गदर्शक सूचनानूसार संबंधित मतदारांची नांवे मतदार यादीतून वगळण्‍याची कार्यवाही करण्‍यात येईल याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्‍यावी.

…..मतदार नोंदणी अधिकारी,28 अकोट विधानसभा मतदारसंघ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here