Monday, April 22, 2024
Homeराज्यरामटेक तालुक्यात लोककला पथनाट्यातून शासनाच्या योजनेचे जनजागृती...

रामटेक तालुक्यात लोककला पथनाट्यातून शासनाच्या योजनेचे जनजागृती…

Share

रामटेक – राजु कापसे

जिल्हा माहिती कार्यालय नागपूर तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालय नागपूर विभाग द्वारा व जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती रामटेक यांचा विद्यमाने रामटेक तालुक्यात तील कारवाई ,डोंगरी, कांदरी, शितलवाडी, व बिजेवाडा खैरी या ग्रामपंचायती मध्ये सदर संस्थेच्या वतीने पथनाट्यातून शासनाच्या विविध योजनेची माहिती जनतेला देण्यात आली.

योजनेच्या सविस्तर प्रारूप कलावंतांनी आपल्या गायन कलेतून जनतेपर्यंत पोहोचविले. उदाहरणार्थ संजय गांधी निराधार, श्रावण बाळ , वृद्धपकाळ, लाडली बेटी इत्यादी शासनाच्या योजना कलावंतांनी आपल्या पथनाट्याच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविले. दरम्यान शासनाकडून प्राप्त झालेल्या पुस्तिका लढा नागपूरच्या या पुस्तकाचे वितरण करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला प्रत्येक ग्रामपंचायतचे पदाधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने कार्यक्रमाला उपस्थित होते. जनतेने सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. त्यानंतर संस्थेचे सचिव शाहीर अलंकार टेंभुर्णे यांनी सर्व ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी त्याचप्रमाणे सर्व ग्रामवाससीयांचे आभार मानले.


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: