पबजीमुळे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या !…नेर तालुक्यातील पिंपरी मुखत्यारपुर येथील घटना

सचिन येवले ,यवतमाळ

यवतमाळ : नेर तालुक्यातील पिंपरी मुखत्यारपुर या गावात पब्जी या गेमच्या आहारी गेल्यामुळे निखिल पुरुषोत्तम पिलेवान (22)या युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

नेर तालुक्यातील पिंपरी येथील निखिल पुरुषोत्तम पिल्लेवान (22)या युवकाने घरात कोणी नसताना पब्जी या गेमच्या आहारी गेल्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली.

निखिल हा पुणे येथील एका खासगी कंपनीमध्ये कामावर होता. लॉकडाऊनच्या आधी तो आपले बीए फायनलचे पेपर देण्यासाठी गावाकडे आला होता. मागील तीन महिन्यांपासून निखिलच्या हाताला कुठलेही काम नसल्यामुळे तो दिवस-रात्र पब्जी हा गेम खेळत होता.

दररोज तब्बल सोळा सोळा तास तो मोबाईल वर गेम खेळायचा. या गेमच्या आहारी गेल्यामुळे आज त्याने टोकाचे पाऊल उचलत सकाळी घरी कोणी नसतात आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेची संदर्भात नेर पोलिसात तक्रार देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here