तेल्हारा – गोपाल विरघट
तेल्हारा तालुक्यातील सिरसोली येथिल नागरिक यांनी विद्युत पूरवठा नेहमी खंडीत होत असल्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून तक्रार करीत होते शेवटी नागरिकांनी तेल्हारा विद्युत महामंडळात धाव घेवुन दि.२५ सप्टेंबरला अडगाव, शिवाजी नगर, सिरसोली, आकोली, काळेगाव येथील नागरिकांनी व पंचायत समिती तेल्हारा गटनेता प्रा. संजय हिवराळे यांच्या नेतृत्त्वाखाली तेल्हारा विद्युत महामंडळात धाव घेवुन जोपर्यन्त विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही,
तोपर्यंत विद्युत महामंडळाच्या कार्यालयाच्या बाहेर निघणार नाही असा ईशारा पंचायत समिती तेल्हारा चे गटनेता प्रा.संजय हिवराळे यांनी दिला असता विद्युत महामंडळाचे अभियंता कोहाळ यांनी कार्यालयात येऊन नागरिकांच्या समस्या जानुन घेतल्या आणि संबधीत तसेच मगरूर भाषेत नागरिकांशी बोलणाऱ्या लाईनमनवर तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन अभियंता कोहाळ यांनी दिले.
यावेळी सिरसोली येथिल वंचित बहुजन आघाडी चे जेष्ठ नेता इरफान अली, पंचायत समिती तेल्हारा चे गटनेता प्रा.संजय हिवराळे, धम्मपाल दारोकर, रंजित भारसाकडे, शहाबाबु, प्रशांत कांईगे, वैभव राउत, विनोद सगने, महेन्द्र मते, रामेश्वर गावंडे, काशिनाथ धांदे,
संतोष खोटरे कैलाश तायडे, काळेगाव चे सरपंच प्रमिला गवई, माधुरीताई हिवराळे आदि सह नागरीक उपस्थित होते जर विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येणार असल्याचं अभियंता कोहाळ साहेब यांना निवेदनाव्दारे सांगण्यात आले.