नांदेड जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्या.खा. चिखलीकर यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी…

नांदेड – महेंद्र गायकवाड

नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था प्रचंड बिकट झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्थेसह सर्वसामान्य नागरिकांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास करण्याच्या अनुषंगाने प्रभावी उपाय योजना कराव्यात अशी मागणी करत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गिरीराजसिंह आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली.

यावेळी पंचायतराज मंत्री कपिल पाटील, खासदार नवनीत राणा यांची उपस्थिती होती. नांदेड जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या अनुषंगाने खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळेच केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने राज्यराणी एक्सप्रेस नांदेड पर्यंत सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता राज्यराणी एक्सप्रेस मध्ये प्रवाशांना अधिक सुविधा चांगली मिळावी.

अधिकची आसन व्यवस्था उपलब्ध व्हावी यासाठी या रेल्वेस अतिरिक्त सहा डब्बे सोडावे अशी मागणी खासदार चिखलीकर यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे भेट घेऊन केली. रेल्वे सेवा चांगल्या दर्जाची उपलब्ध करून देत असतानाच आता खा. चिखलीकर यांनी ग्रामीण भागातील रस्त्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठविला आहे.

नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली बिकट अवस्था यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना होणारा त्रास आणि त्यातून निर्माण होणारे दळणवळणाचे प्रश्न लक्षात घेता ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी केंद्र सरकारने भरीव निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणीही यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली असल्याने महिला प्रसूतीसाठी रुग्णालयातही वेळेवर पोहचविता येत नाही गरोदर माता आणि गर्भातील बाळाचे जीवनही धोक्यात येत आहे . त्यामुळे ग्रामानी भागात विकासाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून रस्ते विकासासाठी भरीव अशी तरतूद करावी या मागणीचा अनुषंगाने खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराजसिंह, यांच्याकडे दिले आहे.

यावेळी पंचायतराज मंत्री कपिल पाटील, खासदार नवनीत राणा आदींची उपस्थिती होती. नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी आपण हा निधी उपलब्ध करून देतील अशी अपेक्षा आहे खासदार चिखलीकर यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here