हाथरस येथील घटणेच्या निषेधार्थ राष्ट्रीय मुस्लिम सेनाच्या वतीने निदर्शने…

आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी.

मूर्तिजापुर – हाथरस येथील कृर घटणेच्या निषेधार्थ राष्ट्रीय मुस्लिम सेनाच्या वतीने शहरातील डॉ बाबासाहेब अंबेडकर पुतळा चौकात जोरदार निदर्शने करण्यात आले व पीड़ित मनीषा वाल्मीकि यांनी मेम्बत्ती लाऊन श्रधांजली देण्यात आली यावेळी राष्ट्रीय मुस्लिम सेनेच्या युवा राष्ट्रीय अध्यक्ष सोहेल शेख,

महाकाल सेना संस्थापक अध्यक्ष लखन मिलांदे, सेवादल कॉंग्रेस जिल्हा सचिव रोहित सोळंके, वंचित बहुजन आघाडी शहर अध्यक्ष तसव्वर खान, असंघटित कामगार कॉंग्रेस शहर अध्यक्ष दीपक खंडारे, एमआईएम युवा नेते सद्दाम पटेल, सेवादल तालुकध्यक्ष सुनिल वानखडे, यांची प्रामूख्याने उपस्थिती होती. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत आरोपींना फाशी देण्याची मागणी राष्ट्रीय मुस्लिम सेनाच्या वतीने करण्यात आली.

निर्भया प्रकरणानंतर कठोर कायदे करुनही देशभरात महिला अत्याचारांच्या घटणांमध्ये कमी आलेली नाही. त्यातच आता उत्तर प्रदेश सरकारने अत्याचार पिढीतेला न्याय देण्याऐवजी आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. १४ सप्टेंबर रोजी चार जणांनी केलेल्या बलात्कारात पिढीतेला भयंकर गंभीर दुखापती झाल्या होत्या. परंतु, पोलिसांनी पाच दिवसांपर्यंत तिची तक्रार नोंदवून घेतली नाही.

तिला ताबडतोब वैद्यकीय मदत मिळाली असती तर तिचा जीव वाचला असता पण, ती देखील नाकारली गेली. तिच्यावर रीतसर अंत्यसंस्कार करण्याचा हक्कसुध्दा तिच्या कुटुंबियांना नाकारत पोलिसांनी तिच्या मृत शरिराचे परस्पर दहन केले. या दुर्दैवी घटणेचे पडसाद संपूर्ण देशात उमटत असून पिढीतेला न्याय देण्यासाठी देशभरात आंदोलन केल्या जात आहे.

मूर्तिजापुरात ही राष्ट्रीय मुस्लिम सेनाच्या वतीने शहरातील डॉ बाबासाहेब अंबेडकर पुतळा चौकात सदर घटनेच्या निषेधार्थ निदर्शने केले. बलात्काराची बळी असलेली युवती व तिच्या कुटुंबाला भाजपच्या सरकारने निर्लज्जपणे न्याय नाकारण्याच्या कृत्याचाही यावेळी धिक्कार करण्यात आला. निदर्शना दरम्याण राष्ट्रीय मुस्लिम सेनाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत घटणेचा निषेध नोंदविण्यात आला.

फाशी द्या, फाशी द्या आरोपींना फाशी द्या, मोदी-योगी सरकारचा निषेध असो, पिढीतेला न्याय मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी घोषणांची फलक हातात घेउन राष्ट्रीय मुस्लिम सेनाच्या वतीने घटनेचा निषेध करण्यात आला असून आरोपींना फाशी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

यावेळी राष्ट्रीय मुस्लिम सेनाच्या शहर अध्यक्ष मो शब्बीर तालुकध्यक्ष मो शोएब शहर कार्याध्यक्ष अल्ताफ पठान युवा शहर अध्यक्ष अरबाज खान शहर सचिव नसरुल्लाह खान शहर सचिव तौसीफ खान तालुका कार्याध्यक्ष मो शोएब रियासोद्दीन , मो इरफ़ान , साजिद डागा , मोईन अली , शोएब खान , मो शाजेब अब्दुल जाफर आदि पदाधिका-यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here