त्रिपुरा येथील अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले व प्रार्थना स्थळाच्या नासधूसी बाबत निषेध.बहुजन समाज कार्यकर्त्यांचे प्रांतांना निवेदन…

सांगली – ज्योती मोरे

आज मिरज येथे त्रिपुरा येथील अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले व प्रार्थना स्थळांच्या नासधूसी बाबत निषेध व्यक्त करून महामहीम राष्ट्रपतीना मिरज प्रांताद्वारे निवेदन देण्यात आले. तसेच बिपालाब कुमार देब सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली व जातीय सलोखा बिघडवणाऱ्यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, व मुस्लिम समाजावर होणारे अन्याय अत्याचार त्वरित थांबवावेत व गुन्हेगारांची तुरुंगात रवानगी करण्यात यावी.

अशी मागणी बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आली निवेदन देताना जैलाब शेख,शंकर कांबळे, महबूबअली मनेर,प्रशांत ढंग,तोफिक कोतवाल,रमेश लाड,शिराज शिकारी,जमीर डांगे,अल्ताफ इनामदार,शाहिद शेख आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here