रस्त्यावरील खड्डयात दिवाळीची पहिली अंघोळ करुन प्रशासनाचा निषेध :-राष्ट्र विकास सेनेचे अनोखे आंदोलन…

सांगली – ज्योती मोरे

सांगली शहर व ग्रामीण भागातील मृत्यूचे सापळे बनलेले रस्ते खड्डे मुक्त करा या मागणीसाठी, राष्ट्र विकास सेना गेली महिनाभरापासून वेगवेगळ्या माध्यमातून मोर्चे, निदर्शने करूनही दखल न घेतल्याने आक्रमक होऊन,राष्ट्र विकास सेनेच्या वतीने आज मंगळवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी पहाटे 6 वाजता सांगली शहर,

ग्रामीण भागातील जिल्ह्यातील मृत्यूचा सापळा बनलेले रस्ते खड्डे मुक्त होण्यासाठी युवक प्रदेश अध्यक्ष प्रशांतभाऊ सदामते यांनी महापालिका प्रशासन व जिल्हा परिषद अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी दिवाळीची पहिली अंघोळ सांगली इस्लामपूर हायवेवर पडलेल्या खड्ड्यात बसून करुन, प्रशासनाचा अनोख्या पध्दतीने निषेध केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here