शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ वाड्यात, भारतीय जनवादी महिला संघटनेचा मोर्चा…

वाडा – केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ दिल्ली येथे सुरू असलेले देशव्यापी आंदोलनास अखिल भारतीय किसान सभा व अखिल भारतीय जनवादी महिला संघटना वाडा तालुका कमिटीच्या वतीने जाहीर पाठींबा व्यक्त करत गुरुवारी (दि.३) वाडा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. 

भाजपाचे केंद्र सरकार दिल्ली येथे सुरू असलेले शेतकरी आंदोलन बळाच्या जोरावर दडपून टाकु पाहत आहे. यासाठी शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा करून, अश्रुधूर सोडून , शेतकरी नेत्यांना स्थानबद्ध करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे.

केंद्र सरकारच्या या शेतकरी विरोधी धोरणाचा व दडपशाहीचा अखिल भारतीय किसान सभा व अखिल भारतीय जनवादी महिला संघटना वाडा तालुका कमिटी जाहीर निषेध व्यक्त करीत असून,  शेतकरी संघटनांच्या या आंदोलनास पुर्ण पाठींबा असल्याचे मत कॉ. आरती डावरे यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here