कोरोनापासून नागरिकांची सुरक्षा करणे हेच प्रथम प्राधान्य – महापौर सौ. मोहिनी येवनकर…

नांदेड – महेंद्र गायकवाड

कोरोना महामारी पासून शहरातील नागरिकांची सुरक्षा करणे हेच प्रथम प्राधान्य असून शहर विकासासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करणे व मनपाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मनोगत नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर सौ. मोहिनी विजय येवनकर यांनी पत्रकारांपुढे व्यक्त केले.

नांदेड वाघाळा महानगरपालिका महापौर पद हे मागास महिला प्रवर्गासाठी (ओ.बी. सी.) राखीव होते.महापौर व उपमहापौर पदासाठी एकमेव अर्ज आल्यामुळे केवळ निवडीची औपचारिकता बाकी होती. त्यानुसार महापौरपदी काँग्रेसच्या सौ मोहिनी विजय येवनकर व काँग्रेसचेच मसूद अहेमद खान यांची अधिकृत निवड करण्यात आली.

आज 22 सप्टेंबर रोजी महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहामध्ये झालेल्या ऑनलाईन विशेष सभेमध्ये जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी महापौर व उपमहापौर पदासाठी एकमेव अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.यावेळी आयुक्त डॉ सुनील लहाने,नगरसचिव अजितपालसिंघ संधू यांची उपस्थिती होती.

महापौर व उपमहापौर यांनी पदाचा कारभार स्वीकारल्या नंतर आ. अमरनाथ राजूरकर, आ. मोहनअण्णा हंबर्डे,जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, जि.प.सदस्य संजय बेळगे,बिलोलीचे माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच्यासह मनपाचे नगरसेवक, काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here