प्रा जगदीश गुजरकर यांना पीएच.डी…

रामटेक – राजु कापसे

रामटेक – राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रामटेक येथील मराठीचे विषयाचे कनिष्ठ व्याख्याता प्रा जगदीश घनश्यामजी गुजरकर यांना नुकतीच रातुम नागपूर विद्यापीठाने मराठी विषयात पीएच.डी पदवी प्रदान केली आहे.

‘सदानंद देशमुख यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास ‘ या विषयावर त्यांनी सी.पी.अँड बेरार महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ. अलका इंदापवार यांच्या मार्गदर्शनाखाली शोधप्रबंध पूर्ण केला.याबद्दल त्यांनी मार्गदर्शक,परीक्षक, नागपूर विद्यापीठ व मराठी विभाग यांचे आभार मानले आहे.

डॉ.गुजरकर यांनी आपल्या यशाचे श्रेय गुरुवर्य स्व.प्रा कृष्णा चौधरी, आई विठाबाई गुजरकर,गजानन पुरी,डॉ गिरीश सपाटे, ,डॉ छोटू पुरी, पवन कामडी,प्रा श्रीकांत येरपुडे,प्रा संतोष ठकरेले,प्रा श्याम टाले,डॉ. सावन धर्मपुरीवार,डॉ गिरीश काठिकर,अविनाश शेंडे,उमेश पटले यांच्यासह सी पी अँड बेरार महाविद्यालय नागपूर,

विद्यासागर कला महाविद्यालय व एस. एन.टी महाविद्यालय रामटेक येथील सर्व प्राध्यापक,राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या संस्थेचे पदाधिकारी,प्राचार्य,प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी वर्ग, तसेच आप्त स्वकीय व मित्र परिवारातील सर्व सदस्यांना दिलेले आहे. डॉ.जगदीश गुजरकर कवी व समीक्षक असून मराठी विषयात नेट परिक्षासुद्धा ते उत्तीर्ण आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here