मा.पोलीस आयुक्त यांचे विशेष पथक यांची जुगार रेड बाबत कार्यवाही…

मा.डॉ.आरती सिंह पोलीस आयुक्त, अमरावती शहर यांचे आदेशाप्रमाणे विशेष पथकातील सहायक पोलीस निरीक्षक योगेश इंगळे, सुरज चव्हाण ब.न. ४०६, राजिक रायलीवाले ब.न. १८६८, निखील गेडाम ब.न. १२९७ सुभाष पाटील ब.न. १२८०, जहीर शेख ब.न. १११७, रंजीत गावंडे ब.न. ४३६, रोशन व-हाडे ब.न. ४६१,

सुरज चव्हाण ब.न. ४०६, राजिक रायलीवाले ब.न. १८६८, निखील गेडाम ब.न. १२९७ यांना दिनांक ०६.१२.२०२१ रोजी मिळालेल्या गोपनीय माहिती प्रमाणे दिनांक ०६.१२.२०२१ रोजी १)पोलीस स्टेशन खोलापुरी गेट हद्यीतील सक्करसाथ येथील बालाजी मंदिरा जवळ वरळी जुगार रेड केली असता जुगार खेळणारे

१)मुकेश शामराव भलावी वय ३१ रा. स्वागत कॉलनी गोपालनगर जवळ २) आकाश अनिल मौर्य वय २५ रा. सक्करसाथ ह.मु. साबनपुरा ३) ज्ञानेश्वर नामदेवराव भातकुलर वय ६८ रा. नवसारी अमरावती यांचे ताब्यातुन नगदी ३४,१६०/-रू. ३ मोबाईल १०,५००/- रू. व वरळी जुगाराचे साहित्य असा एकूण ४४,६६०/- रूपयाचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.

सदर वरळी जुगाराची उतारी ही आरोपी सचिन शर्मा रा. शनीमंदिर यांचे कडे करण्यात येत असुन सदर आरोपी हा फरार आहे. वरळी जुगार खेळणारे आरोपी व मुद्येमाल पोलीस स्टेशन खोलापुरी गेट यांचे ताब्यात पुढील कारवाईस देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here