घरफोडी करणार अट्टल चोर व त्याच्या साथीदार जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा व नागपूर ग्रामीण पोलीस यांची कार्यवाही…

रामटेक – राजु कापसे

आज दि 1 जुले 2021 ला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक कन्हान परिसरात नाकाबंदी करीत असताना त्यांना ऑटोरिक्षा क्र mh 49 ar 3069 या संशयित वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये मोहमद शहजाद मोहमद सलीम उर्फ गुगरू वय 29,इरफान सय्यद रुस्तम वय20,

जिया खान उर्फ मुन्ना नसरुलाखांन वय 28 सर्व रा कामठी यांची चौकशी केली असता त्यामध्ये गुंगरु नामक युवक हा घरपोडी अट्टल चोर असल्याने पोलिसांनी सर्वाना त्याबात घेतले 2 गॅस सिलेंडर,2 एल सी डि टीव्ही, व त्यांच्याकडून 2 मोबाईल फोनअसा एकूण 1,39,000 रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी घुंगरू नामक अट्टल चोर घरफोडी याला पकडले असता त्याच्यावर नागपूर शहर ,ग्रामीण ,भंडारा,मध्यप्रदेश येथील चोरी प्रकरणात त्याच्यावर आरोप आहे.माहे एप्रिल 2021 ला पत्याच्यावर कामठी येथे अवैध रित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंद असून तो फरार होता.पोलिसांनी त्याला पकडले असता ग्रामीण व जिल्हयातील एकूण 10 प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

स्थानिक ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस यांनी गुंगरु याला समोर कार्यवाही करिता रामटेक पोलीसाना त्याला ताब्यात दिले आहे.सदर कार्यवाही नागपूर ग्रामीन अधिशक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक राहुल माखनिकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अनिल जित्तवार, सहायक पोलीस निरीक्षक राजीव कर्नलवार ,जितेंद्र वेरागडे,पोलीस हवालदार दयनेशवर राऊत,दिनेश अधापुरे,अमोल वाघ,विपिन गायधने पोलीस पथकाने पार पाडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here