मंत्रालया बाबतच्या अडचणी व समस्या मार्गी लावून धान खरेदी करा बैठकीत छगन भुजबळ व खासदार : प्रफुल पटेल यांच्या सुचना…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

धान खरेदी करताना शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी येवू नयेत, धान विहित वेळेतच खरेदी केले जावे याची खबरदारी सर्व यंत्रणांनी घ्यावी, शेतकऱ्यांकडून धान खरेदीदरम्यान येणार्‍या अडचणी व समस्या दिलेल्या सूचनांप्रमाणे मार्गी लावावी, अशा सूचना अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित बैठकीत खासदार प्रफुल पटेल यांनी केल्या.

पूर्व विदर्भात धानखरेदी करताना अभिकर्ता संस्था तसेच शेतकर्‍यांना अनेक अडचणींना समोर जावे लागत आहे. या समस्या मार्गी लावण्याच्या अनुसंगाने खासदार प्रफुल पटेल यांच्या आग्रहास्तव मंत्रालयात आज विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत धानखरेदी केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे याविषयावर चर्चा करण्यात आली. दरम्यान तुर्त कॅमेर्‍यांची गरज नाही. असे अधिकार्‍यांच्या माध्यमातून निदर्शनास आले.

बारदानाचा अभाव असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. यावर छगन भुजबळ यांनी बारदाना पर्याप्त प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. धानखरेदी करताना बारदान्यावर टॅग लावण्याची प्रक्रिया आहे मात्र, हे टॅग लावण्याची गरज नाही. तसेच मशिनने बारदाना शिवण करण्याचे काम गरजेचे नाही. अशा सुचना केल्या. तसेच मागील वर्षी मोठ्या प्रमाणात धानखरेदी केंद्रावर धानाची नासाडी झाली होती.

याबाबत उपाययोजना करून यंदा खरेदी करण्यात येणारा धान सुरक्षित राहण्याच्या अनुसंगाने कारवाई करावी, अशाही सुचना केल्यात. त्याचप्रमाणे अभिकर्ता संस्थांच्या समस्या त्वरित मार्गी लावण्याचे निर्देश छगन भुजबळ यांनी दिले.

याप्रसंगी खासदार प्रफुल पटेल यांनी नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात धानखरेदी वेळेत केली जावी. धान साठवणूकीसाठी गोदामांची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी धानाच्या साठवणुकीचे प्रश्न सोडवावे, त्याचप्रमाणे शेतकर्‍यांना कोणत्याही केंद्रात गैरसोय होणार नाही. या बाबत दखल घेवून निर्माण होणार्‍या अडीअडचणी त्वरित मार्गी लावावे तसेच मंत्री महोदयांनी दिलेल्या सुचनांचे पालन करून धान सुयोग्य पध्दतीने खरेदी करावी, अशा सुचना त्यांनी केल्या.

बैठकीत अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, आमदार राजू कारेमोरे, अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणचे सचिव विजय वाघमारे, महाराष्ट्र राज्य सहकारी व पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकर तेलंग, दूरदृश्यप्रणालीव्दारे महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दिपक सिंघला,जिल्हाधिकारी नयना गुंडे, भंडार्‍याचे जिल्हाधिकारी संदीप कदम, बाजार समितीचे लोमेश वैद्य, प्रवीण बिसेन, रेखलाल टेम्भारे, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोलीचे जिल्हा पुरवठा अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here