इनरव्हिल क्लबच्या राज्यस्तरीय स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न…

अहमदपूर – बालाजी तोरणे

भारताच्या ७४ व्या स्वातंञ्यदिना निमित्त इनरव्हील क्लब अहमदपुरच्या वतिने राज्यस्तरीय भाषण,निबंध व सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या ऑनलाईन स्पर्धेस राज्यभरातुन उदंड प्रतिसाद मिळाला होता,यात राज्यभरातुन ९४१ विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत सहभाग घेतला होता.त्या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आज जागतिक शांतता दिनाचे औचित्य साधुन अहमदपुर येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्लबच्या अध्यक्षा डाॅ मिनाक्षी करकनाळे या होत्या तर या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणुन डॉ.भाग्यश्री यलमटे,शिवालिका हाके पाटील उपस्थित होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन प्राचार्या शोभाताई टोंपे या होत्या.आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेच्या प्रमुख मुख्याध्यापिका आशा रोडगे,कलावती भातांब्रे,अनिता जाजु या होत्या.

कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व शांतता दिनानिमित्त मेणबत्ती प्रज्वलित करून जगाला शांततेचा संदेश देण्यात आला.या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शोभाताई टोंपे यांनी शांतता दिना विषयी सखोल मार्गदर्शन करत शांततेची गरज पटवुन सांगीतले तर शिवलीका हाके यांनी स्पर्धा परीक्षेचे जीवनातील महत्त्व सांगितले.

डाॅ.मिनाक्षी करकनाळे यांनी अध्यक्ष समारोप प्रसंगी कोरोनाच्या काळात घ्यावयाची काळजी व इनरव्हिलच्या कार्याचा आढावा सांगितला.या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रातुन विजेते विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी हजेरी लावली होती.यावेळी कार्यक्रमास रणजित चौधरी,ज्ञानोबा घोसे,शोभाताई माने,बाबासाहेब वाघमारे,कपिल गारडे,शितल मालु,शामल साळुंके,ज्ञानेश्वर जवळे,चंद्रशेखर नळेगावकर,गादगे सर आदि मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका तथा इनरव्हील क्लबच्या कोषाध्यक्षा आशा रोडगे यांनी केले,सुञसंचलन कलावती भातांब्रे मॅडम यांनी तर आभार डाॅ.भाग्यश्री यलमटे यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक उद्धव शृंगारे सर,संगिता आबंदे,बब्रुवान कलाले,अर्चना जांबळदरे,सतिश साबणे,नंदकुमार मद्देवाड, ज्ञानेश्वर चव्हाण, संजीवनी गुरमे, शारदा तिरुके उमेश फुलारी,पद्माकर नळगिरे आदींनी विशेष परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here