मनीषा मसतकर, अमरावती
निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेनंतर आसाममधील निवडणूक प्रचारही चागला जोर धरीत आहे. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आज गुवाहाटीला आल्या असता त्यांनी कामाख्या देवीच्या मंदिरात पूजनाने निवडणुकीचा प्रारंभ केला. तर यावेळी प्रियांका गांधी यांनी पारंपारिक झूमर नृत्य केले.
विशेष म्हणजे, गुवाहाटीचे जगप्रसिद्ध कामख्या मंदिर कोच राजा नरनारायण यांनी 1965 मध्ये नूतनीकरण केले. हे भारतातील 51पवित्र मंदिरांपैकी एक आहे. प्रियांका गांधी येथे लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता.
लाल रंग हा शक्तीचे प्रतीक देखील मानला जातो. यानंतर प्रियंका गांधींनी लखीमपूरला भेट दिली. येथे त्यांनी चहा बागेत काम करणाऱ्या लोकांसह पारंपारिक झूमर नृत्य देखील सादर केले.