महिला पोलीस कर्मचारीचे आंघोळीचे खाजगी फोटो व्हायरल…गुन्हा दाखल

न्यूज डेस्क – राज्यात सायबर क्राईम चे अनेक प्रकरण समोर येतात मात्र आज पोलीस खातही सुरक्षित नसल्याचे दिसून आले आहे. बुलडाणा जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका महिला पोलिस कर्मचारीचे खाजगी फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी पिडीत महिला पोलिस कर्मचारीने दिलेल्या तक्रारीवरुन बुलडाणा शहर पोलिस स्टेशनमध्ये विनयभंगसह आयटी अक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलिस दलात कार्यरत एका महिला कर्मचारीचे अंघोळ करतांनाचे खाजगी फोटो तिच्या ई मेल आडीवर सेव्ह होते. हा ईमेल आयडी हॅक करुन जवळपास ३० प्रायवेट फोटो पिडीत महिला पोलिस कर्मचारीच्या मैत्रिणीच्या मोबाईलवर अश्लील संदेश लिहून पाठविण्यात आले. ही बाब पिडीत पोलिस महिला कर्मचारीच्या लक्षात येताच तिने बुलडाणा शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे .

यावरुन अज्ञात मोबाईल धारक क्र . ७०५८७२५५०८ असलेल्या आरोपीवर विनयभंगची कलम ३५४ , ३५४ (ड) आयटी ॲक्टचे ६६ (सी), ६६ (ई)६७ (ए) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आरोपीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सायबरसेलकडे वर्ग करण्यात येणार आहे . तपासअंती पिडीत महिला पोलिस कर्मचारीचे नग्न फोटो कोणी व्हायरल केले हे समोर येणार आहे. पुढील तपास दत्तात्रय नागरे हे करीत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here