प्राथमिक आरोग्य केंद्र बाभूळगाव तालुका पातुर येथील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला सत्कार समारंभ संपन्न…

पातूर – निशांत गवई

प्राथमिक आरोग्य केंद्र बाभूळगाव येथील कार्यालयात कर्मचारी पंढरी राठोड(औ. नि. अ ), त्र्यंबक राठोड (तंत्रज्ञ), सुधाकर गायकवाड(आ से ), श्रीमती सुलोचना अवचार (आ से ), हे सर्व कर्मचारी दिनांक 30/06/ 2019 ला सेवानिवृत्त झाले आहेत या सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्य काळामध्ये पंचक्रोशीतील जनतेला उत्तम आरोग्य सेवा दिली त्यामुळे परिसरातून जनतेकडून त्यांचे कामाचे कौतुक करण्यात आले.

त्यांना उत्कृष्ट कामामुळे वरील प्राथमिक आरोग्य केंद्र अकोला जिल्ह्यातून प्रथम व महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे.हा कार्यक्रम डॉक्टर पेढारकर अध्यक्ष, डॉक्टर प्रफुल्ल शिरसाठ सह अध्यक्ष, डॉक्टर अंकुश शिंदे सहा अध्यक्ष, डॉक्टर खान व खेकडे सर, यांचे मार्गदर्शनातून मेश्रे, श्रीमती कासार, श्रीमती देशमुख, श्रीमती पोरे, श्रीमती कुराई, सुनील कराळे, गजानन खंडारे, श्रीमती राठोड, श्रीमती दिपाली वानखडे, भटकर बाबू साहेब,

मराठे, कुमारी लक्ष्मी जाधव, धाडसे, देशमुख, गजानन टिकार, विशाल देशमुख, यांनी व सर्व कर्मचारी वृद्ध प्राथमिक आरोग्य केंद्र बाभूळगाव यांचे अध्यक्ष परिश्रमातून आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाकरिता तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातून ठाकूर, डिक्कर , थुटे, व पाथरकर यांचे उत्तम सहकार्य लाभले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here