कोरोना मुक्ती होउन जनजीवन सुरळीत व्हावे हीच गणराया चरणी प्रार्थना :- डॉ ओळंबे…

अकोला – गोकुळ हिंगणकर

अकोला संपूर्ण विदर्भात प्रख्यात असलेला मनाचा गणपती म्हणजेच बाराभाई गणपती.अकोला जिल्ह्यात गणपती उत्सव हा मोठ्या प्रमाणात करण्यात येतो.गणेश चतुर्थीला गणेशजी गणपती बाप्पा स्थानांपन्न होतात व अंनत चतुर्थदशीला विसर्जन करण्यात येते विसर्जनाची सुरवात अति प्राचीन असलेल्या बाराभाईच्या गणपतीचे सर्वप्रथम पूजन करण्यात येऊन जयहिंद चौक येथून होते व नंतरच बाकी सर्व गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला खरी सुरुवात होते.

सन २०१९ पासून कोविड संसर्गामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीला बंदी असून २०२१ उजाडला तरी बंदी कायम आहे.आगामी २०२२ मध्ये तरी सर्व धर्मियांची मंदिरे उघडावी व कोरोना मुक्ती होउन सर्व परिस्थिती पूर्ववत व्हावी यासाठी भाजपा नेते डॉ अशोक ओळंबे यांनी मानाचा बाराभाई गणपतीची पूजा अर्चा करून गणरायाला साकडे घातले यावेळी गजानन गोलाईत,राहुल इंगळे,व बाराभाई मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here