प्रोअक्टिव अबॅकसद्वारा आयोजित इंटरनॅशनल कॉम्पिटिशन 2021-22 देशात सर्वत्र घेण्यात आली. प्रत्युष प्रोअक्टिव अबॅकस यवतमाळचे संचालक श्री. अनिल राऊत सर तथा केंद्र समन्वयक सौ.राणी राऊत मॅडम यांनी विद्यार्थ्यांना अबॅकस गणितीय सिद्धांत, प्रात्यक्षिका मार्फत शिक्षण दिले. संचालकांना उत्कृष्ट केंद्राचा अवॉर्ड मिळाला.
या केंद्रामधून एकुण 20 विद्यार्थी यशस्वी झाले.त्यामधे 1)कु. मृण्मयी दुरतकर टॉपर 2)अनिरुध्द अक्कलवार-द्वितीय 3) कु.आयुषी पडोळे-द्वितीय यशस्वी झाले. त्याच प्रमाणे कु.परिमिती नगराळे,कु.प्रविधी भगत चि.सुहान जीलथे,प्रशिक दिघाडे,श्लोक खरकटे, सोहम कोवे,वंश लोखंडे,कु.स्नेहल निस्ताने,कु.विधिना इंगोले,कु.आर्या सोनोने, कु.तनुश्री कांबळे,कु. शिवानी इटकरे,कु. कस्तुरी मानकर,चि. प्रत्युष राऊत,चि.मंथन नगोशे,कु.शर्वरी ढाले,कु. गौरी माजरे यशस्वी झाले.
केंद्रस्थळी बक्षिस वितरण समारंभाचे आयोजन दि.30 जानेवारी 2022 ला सकाळी 11:00 वाजता संचालकांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून श्री. प्रकाश राऊत,श्री.तजेंदर चावला,श्री.विनोद इंगोले, श्री.संतोष मोरे,श्री. सुजित राय,श्री.रवी राऊत यांचे शुभहस्ते ट्रॉफीचे वितरण करून भावी आयुष्याच्या शुभेच्छा विद्यार्थांना देण्यात आल्या. कोरोनाचे नियम पाळून काही पालक उपस्थित होते.