चार महिन्यानंतर दिला सदोष जन्म प्रमाणपत्र; दिघोरी मोठी येथील ग्राम विकास अधिकाऱ्याचा प्रताप…

लाखांदूर – नास्तिक लांडगे

गत मे महिन्यात ग्रा.पं.कडून जन्मदाखला मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला असताना हेतूपुरस्पर टाळाटाळ करीत तब्बल चार महिन्यांनी सदोष जन्म प्रमाणपत्र दिल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. सदर प्रकार तालुक्यातील दिघोरी/ मोठी येथील ग्रामपंचायती अंतर्गत ग्राम विकास अधिकाऱ्या च्या प्रतापाने घडला असल्याची माहिती आहे.

प्राप्त माहितीनुसार दिघोरी /मोठी येथील विजय देविदास निमजे(28) वर्षे नामक युवकाने 4 मे रोजी येथील ग्रामपंचायत कार्यालयात जन्म प्रमाणपत्र साठी ऑनलाइन अर्ज दाखल केला होता.मात्र संबंधित अर्जाकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष करीत येथील ग्राम विकास अधिकाऱ्यांनी तब्बल चार महिन्यापर्यंत जन्म प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान ऑनलाइन अर्ज दाखल करून अनेक दिवस लोटले असताना ग्राम विकास अधिकाऱ्यां कडून जन्म प्रमाणपत्र दिले जात नसल्याने वैतागलेल्या अर्जदाराने सबंधित प्रकरणी लाखांदूर बिडीओ कडे माहिती देऊन जन्म प्रमाणपत्र मिळण्यासाठी आदेशित करण्याची मागणी केली.त्यानुसार गत 16 सप्टेंबर रोजी येथील ग्रा.पं. कार्यालया अंतर्गत स्पीड पोस्ट मार्फत सदोष जन्म प्रमाणपत्र पाठविण्यात आले आहे.

मात्र सदर प्रमाण पत्रावरील इंग्रजी भाषेतील मुळाक्षरे दोषपूर्ण आढळून आल्याने तब्बल चार महिन्यांनी उपलब्ध करण्यात आलेल्या जन्म प्रमाणपत्र विषयी नाराजी व्यक्त करताना येथील ग्राम विकास अधिका-या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेऊन जन्म प्रमाणपत्रासाठी तब्बल चार महिन्याचा वेळ घेणाऱ्या ग्राम विकास अधिका-या विरोधात तात्काळ कारवाई करावी अशी मागणी पीडित युवकाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here