प्रणव मुखर्जी यांच्या रूपात भारताने एक थोर मुत्सद्दी नेतृत्व गमावले !…अशोक चव्हाण

महेंद्र गायकवाड
नांदेड
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे देशाने एक थोर मुत्सद्दी गमावल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.मुखर्जी यांनी श्रद्धांजली अर्पण करताना चव्हाण म्हणाले की, त्यांचे संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी समर्पित होते.

देशाची अर्थ निती व परराष्ट्र धोरणात त्यांनी महत्वाचे योगदान दिले. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्वाची पदे भूषवली. त्यांच्या रूपात भारताचे एक अनुभवी मार्गदर्शक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्याशी चव्हाण कुटुंबियांचे घनिष्ठ संबंध होते. ते आणि डॉ. शंकरराव चव्हाण केंद्रीय मंत्रिमंडळात सहकारी होते. संघटनात्मक आणि शासकीय कामांच्या निमित्ताने मलाही अनेकदा प्रणव मुखर्जी यांच्याशी विस्तृत चर्चा करण्याची संधी मिळाली.

ते एक अतिशय प्रतिभाशाली, अभ्यासू व्यक्तीमत्व होते. त्यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद असून, मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here