अकोला जिल्ह्यातील ३,००३ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित…

अकोला – अमोल साबळे

महावितरणच्याअकोला परिमंडळांतर्गत अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील ५ हजारापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या विविध वर्गवारीतील ७ हजारापेक्षा जास्त थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील ३,००३ ग्राहकांचा समावेश असून, त्यांच्याकडे ५.६७ कोटीचे वीज देयके थकीत आहे.

कोरोना काळात वसुली ठप्प झाल्याने आर्थिक गणित कोलमडलेल्या महावितरणच्या वसुलीसाठी मुंबई कार्यालय, प्रादेशिक कार्यालयांकडून पाठपुरावा, आढावा घेण्यात येत आहे. परिणामी महावितरणने वसुली मोहीम तीव्र केली आहे. प्रत्येक लाईनस्टाफला थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांवर कारवाईचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा धडाका महावितरणने लावला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ३,००३ थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

देयक भरण्याचे विविध पर्याय

थकीत वीज बिलाचा भरणा करता यावा यासाठी महावितरणची वीज बिल भरणा केंद्रे सुटीच्या दिवशीही उघडी ठेवण्यात आली आहेत. याशिवाय वीज ग्राहकांना महावितरणचे संकेतस्थळ व महावितरण मोबाईल ॲपव्दारे ऑनलाईन वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here