शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत रोहित्र शिकस्त, तरीही विद्युत कर्मचारी मात्र मस्त…

तेल्हारा म. रा.विद्युत वितरण कंपनीच्या मनमानी बेताल वर्तुणीकीला कुणी आवर घालेल का? असा आर्त सवाल घोडेगाव येथील शेतकरी करत आहेत. येथील एकही जवाबदार अधिकारी देखील जवाबदारीने वागताना दिसत नाही.

सविस्तर वृत्त असे की घोडेगाव येथील रामदेव बाबा मंदिरामागील सुनील ढोले यांच्या शेतात असणारे रोहित्र खूपच शिकस्त झाले आहे. यावर्षी खरिपाच्या पिकांनी शेतकऱ्यांना अजिबात साथ दिली नाही जेवढा खर्च लागला त्यापेक्षा निमपट पेक्षाही कमी उत्पन्न शेतकऱ्यांना झाले अशातच आशावादी शेतकरी आपली सारी उमीद लावून बसला तो बागायती पिकांवर बागायती पिकांसाठी लागणारी वीज पुरवठा करणारी विद्युत रोहित्र फार शिकस्त झाले आहेत.

विद्युत दाब कमी जास्त झाल्यामुळे कित्येक शेतकऱ्यांचे मोटारपंप जळालेत अशा नापिकीत शेतकऱ्यांनी पैसा आणावा तरी कुठून असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढे आहे. वायरमनला फोन लावला असता सदानकदा वेळी फोन बंदच येतो अशा दुष्काळात तेराव्या महिन्यागत शेतकऱ्यांना नाहक मोटारी भरून आणण्याची आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

शासनाचा पगार घेऊन वायरमन हे गावातील खाजगी व अर्धवट वायरमनच्या भरवशावर कामे सोडत आहेत परिणामी मोटार पंप जाळण्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. एवढे असूनही हे खाजगी वायरमन देखील कामाची लगबग असल्यामुळे वेळेवर उपलब्ध होत नाही.

वारंवार तक्रारी करून देखील या तक्रारींना जणू केराची टोपली दाखवली जाते, आपले कोणीही काही वाकडे करू शकत नाही या अविर्भावात हे वायरमन मिरवतात. अशा या मस्तवाल कर्मचाऱ्यांना कोणी वठणीवर आणेल का या भाबड्या आशेवर शेतकरी बसलेले आहेत.तरी तेल्हारा म. रा. वि. वि. कं. च्या शेतकऱ्यांची जाणीव असलेल्या अभियंत्यांनी तथा वरिष्टांनी यात जातीने लक्ष घालून शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करावे हीच जनमानसाची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here