कारंजा रमजानपुर ३३ के.व्ही उपकेंद्रवरून विजेचा लपंडाव…दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव

अकोला : बाळापूर तालुक्यातील कारंजा रम येथील ३३ के. व्ही वीज उपकेंद्रावर जवळपास ३०-३३ गावांची जबाबदारी आहे. मात्र यांपैकी अनेक गावांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासूने विजेचा लपंडाव सुरू आहे. महावितरण कंपनीच्या मनमानी कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना व बागायतीदार शेतकऱ्यांना सहन करावा लागत वीज वीज वितरण कंपनीच्या विरोधात कारंजा रम परिसरातील ग्रामस्थ रोष निर्माण झाला आहे.

कारंजा रमजानपुर अंतर्गत ३३ के. व्ही उपकेंद्रांतर्गत ३०-३३ गावांना वीज पुरवठा केला जातो. वीज पुरवठ्यावर अवलंबून असलेले छोट्या-मोठ्या उद्योगांना महावितरण कंपनी मुळे मोठा फटका बसत आहे. घरगुती वापरातील विजेची उपकरणे विजेच्या लपंडावामुळे निरुपयोगी ठरत आहेत. आधीच या गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. त्‍यातच विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे कारंजा रमजानपुर पाणी पुरवठा योजना १२-१३ गावांना पाणी पुरवठा केला जातो. परंतु विजेच्या लपंडावामुळे ही योजना निरुपयोगी ठरत आहे

संध्या चालू असलेल्या प्रचंड तापमानामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. त्यातच वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे अनेकांना व उष्णतेचा फटका बसत आहे. वीज पुरवठा खंडित राहिल्यामुळे त्याचा परिणाम पाणी पुरवठा योजना,लघुउद्योग, पीठगिरणी, महासेवा केंद्र , बागायतदार शेतकरी, वेल्डिंग वर्क्स इत्यादी तसेच रात्री-अपरात्री जाणार्‍या वीजमुळे वीज वितरण कंपनीविरोधात संताप व्यक्त केला आहे.


संबंधित अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन विजपुरवठा नियमित सुरू करावी अशी जनार्दन साबळे, शिवसेना नेते उमेश जाधव,अनिरुद्ध देशमुख, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रविंद्र पोहरे शिवसेना, शेतकरी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष गोपाल पोहरे तसेच अनेक गावातील सरपंच याची मागणी निबा फाटा परिसरातील ग्रामस्थ करित आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here