पोलिओ लसीकरणाची तारीख पुढे ढकलली…

अमरावती दि. १३ जानेवारी :- कोरोना लसीकरण मोहिमेमुळे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. लवकरच त्याची तारीख जाहीर होईल, अशी माहिती अतिरिक्‍त जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. रेवती  साबळे यांनी दिली.

सुरुवातीला पोलिओ लसीकरण मोहिम 17 जानेवारीला घेण्याचे नियोजन होते. तथापि, कोरोना लसीकरण मोहिमेचा 16 जानेवारीपासून शुभारंभ होत आहे. कोरोना लसीकरण चार टप्प्यात होणार असून, पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्करचे लसीकरण होणार आहे. 

वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना प्रथम टप्प्यात लस दिली जाईल. त्यामुळे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची तारीख पुढे ढकलण्यात आली. तारीख पुढे ढकलली तरी पोलिओ लसीकरण मोहिमेचीही तयारी पूर्ण झाली असून, यंत्रणा सुसज्ज आहे. लवकरच या मोहिमेचीही तारीख जाहीर होईल, असे डॉ. साबळे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here