बोदवड – गोपीचंद सुरवाडे
बोदवड तालुक्यातील आदर्श गाव मानमोडी येथील गोपाल शिवलाल पाटील रा मानमोडी ता बोदवड जिल्हा जळगांव येथील युवकाने दि 08/10/2020 रोजी सायंकाळी 07,00 वाजेच्या सुमारास मानमोडी गावी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड बाळासाहेब आंबेडकर यांना उद्देशून बदनामी व्हावी,
म्हणून फोटो सहित शिवराळ भाषा वापरात करून स्टेट्स टाकून अब्रुनुकसान केले म्हणून बोदवड तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सुपदाभाऊ मारोती निकम यांनी दि 09/10/2020रोजी बोदवड चे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांना निवेदन सादर करून तात्काळ गुन्हा दाखल केला,निवेदन देते वेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा अध्यक्ष बाळा भाऊ पवार,
जिल्हा सदस्य सलीम शेख,तालुका सचिव सुभाष इंगळे,सोपान इंगळे जितेंद्र सुर्यवंशी, अनिल गुरचळ, शुभम सोयनके,अविनाश गोठले,आदी उपस्थित होते,या मनुवादी सडक्क्या वृत्तीचा बोदवड वंचित बहुजन आघाडी व जिल्हा पदाधिकारी जाहीर निषेध करीत आहोत असे वंचीत बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष विनोद भाऊ सोनवणे यांनी ” महा व्हाईस” शी बोलतांना सांगितले,