यवतमाळ | शालेय शिष्यवृत्तीसाठी आता पोष्टल बँकेचा आधार…आधार कार्ड व मोबाईल क्रमांकाच्या आधारे खाते उघडणार

सचिन येवले ,यवतमाळ

यवतमाळ, दि. 11 : समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांतर्गत दहावीनंतर विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती दिल्या जाते. शिष्यवृत्तीची रकम त्यांच्या खात्यात जलद गतीने जमा व्हावी म्हणून टपाल विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचा (आयपीपीबी) आधार घेण्याचा निर्णय राज्य शासनाद्वारे घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात 11 हजार 153 विद्यार्थ्यांची खाती उघडण्याची मोहीम सुरू झाली असून त्याची माहिती सर्व विद्यार्थ्यांना एस.एम.एस. द्वारे दिली गेली आहे.

टपाल विभागाच्या आयपीपीबीतर्फे शिष्यवृत्तीसाठी नवीन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत 12 हजार शिष्यवृत्तीधारकांची यादी शासनाने टपाल विभागाला दिली आहे. त्यानुसार सर्व कॉलेजच्या प्राचार्याशी चर्चा करून कॉलेजमध्ये शिबिरे घेऊन विद्यार्थ्यांची खाती उघडली जाणार आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील आयपीपीबीच्या 369 केंद्रावर ही सुविधा उपलब्ध असून केवळ आधार कार्ड क्रमांक व मोबाइल क्रमांकाच्या आधारे खाते उघडले जाईल. या प्रणालीद्वारे विद्यार्थ्याचे नाव टाकल्यावर त्वरीत बँकेत पैसे जमा करणे शासनाला शक्य होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात सप्टेंबर 2018 मध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँक सुरु झाली.

तेव्हापासून 88 हजार 58 खातेधारक झाले आहेत. लॉकडाउन काळात 14 कोटी रुपये बँकेने खातेधारकांना घरपोच पाठवल्याने 19 हजार 914 नवीन खातेधारकांची भर पडली आहे.तरी सर्व विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा व त्यांची शिष्यवृत्ती रक्कम खात्यात जमा करून घ्यावी, असे आवाहन डाक अधिक्षक यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here