उद्या होणार ग्रामपंचायत सरपंचपदाची आरक्षण सोडत…

दर्यापूर – किरण होले

दर्यापुर तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीची सार्वत्रीक निवडणुक दि.१५/०१/२०२१ रोजी पार पडली. व निवडणुक निकाल नियम ३७ प्रमाणे सर्व ग्रामपंचायतला प्रसिध्द करण्यात आला.त्या अनुषंगाने सन २०२० ते २०२५ करीता दर्यापुर तालुक्यातील सार्वत्रीक निवडणुकीव्दारे गठीत होणा-या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत एकुण ७४(संपुर्ण) ग्रामपंचायतीचे दि.०२/०२/२०२१ रोजी जुनी तहसिल कार्यालय,

अमरावती रोड दर्यापुर येथे ठिक ११.०० वाजता काढण्यात येणार आहे. तरी सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी वेळेवर हजर राहावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार योगेश देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here