कोगनोळी येथील पोपट मधाळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन…

राहुल मेस्त्री
कोगनोळी तालुका निपाणी येथील आंबेडकर नगर मधील रहिवासी पोपट गुडांप्पा मधाळे यांचे आज दिनांक 3 रोजी पहाटे साडे पाचच्या दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

आज पहाटे चार वाजल्यापासून त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी स्थानिकच्या चारचाकी गाडीमधून कागल येथे इस्पितळात हलवले होते. मात्र यावेळी त्यांच्यावर उपचार करते वेळी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले.

त्यांनी अखेरचा श्वास कागल येथील इस्पितळात घेतला. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर ते आंबेडकर नगर कोगनोळी येथील जेष्ठ नागरिक होते. त्याचबरोबर शांत व संयमी अशा स्वभावाचे होते. या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे .

.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, एक विवाहित मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे .जल विधी शुक्रवार दिनांक 5 रोजी सकाळी 9:00 वा.आहे….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here