पातूर येथील पूजा महादेव खंडारे अमरावती विद्यापीठांमधून प्रथम, सुवर्ण पदक देऊन सन्मानित…

पातूर – निशांत गवई

पातूर येथील पूजा इलेक्टिकल्स चे मालक व शेतकरी असलेले महादेव खंडारे यांची मुलगी पूजा महादेव खंडारे हिने MSC मधून संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावती विभागातून प्रथम क्रमांक मिळवत पातूर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

विद्यापीठांमधून प्रथम क्रमांक मिळल्याबद्दल पंजाबराव कृषी विद्यापीठ येथे पार पडलेल्या पदवीदान सोहळ्या मध्ये ऑनलाइन उपस्थिती लाभलेले महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा श्री कोशारी यांच्या तर्फे पूजा हीचा सुवर्ण पदक देऊन सन्मान करण्यात आला.

महादेव खंडारे यांची लहान मुलगी सुद्धा वर्धा येथे डाक विभागात नोकरी वर आहे आज खऱ्या अर्थाने मुलगी शिकली प्रगती झाली हि म्हण सार्थक झाल्याचे दिसत आहे
पूजा खं डा रे हिने आपल्या यशाचे श्रेय आपले आई वडील व गुरुजन यांना दिले आहे तसेच सर्व स्तरातून पूजा चे अभिनंदन होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here