पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याकरिता ठिय्या आंदोलनावर राजकारण…

वंचितचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर, जि.प.सदस्याच्या हस्तकाने आंदोलनात घातला गदारोळ…

पातूर – निशांत गवई

आज पातूर पंचायत समिती येथे तालुक्यातील ग्राम तुलंगा बु. येथील महिलांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याकरिता पं. स.गटविकास अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.तुलंगा बु. येथील वॉर्ड क्र.3 मध्ये अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या असून 2021 मध्ये 15 व्या वित्त आयोगातून पाण्याची टाकी ते बौद्ध विहारापर्यंत पाईप लाईन मंजूर करण्यात आली होती.

परंतु अद्यापही सदर काम अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असून याबाबत ग्रामपंचायत सचिव डोंगरे यांना स्थानिकांचनी विचारणा केली असता, “तुमच्याने जे होते ते करून घ्या.” अशे उर्मटपणाचे उत्तर त्यांच्याकडून मिळाल्याने आज तुलंगा बु. येथील महिलांनी गटविकास अधिकारी यांच्या दालनात घागर घेऊन ठिय्या आंदोलन केले.

दरम्यान पातूर पं.स. च्या उपसभापती अर्चना विष्णू डाबेराव यांनी मध्यस्थी करीत सदर पाण्याचा प्रश्न तात्काळ निकाली काढण्याचे आश्वासन देऊन आंदोलकांची मने जिंकली.नेहमी जनतेचे प्रश्न तात्काळ निकाली लावण्यामुळे पं.स.उपसभापती यांची वाढती लोकप्रियता खटकल्याने एका जि.प. सदस्याच्या हस्तकाने सदर आंदोलनात येऊन पंचायत समिती परिसरात गदारोळ घालून श्रेयवाद निर्माण केल्याने पातूर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी मधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला.

पातूर पं.स.उपसभापती व एक जि.प. सदस्य यांच्या मध्ये या अगोदर सुद्धा चढाओढीच्या राजकारणातून वाद विकोपास गेलेला होता,त्यात आज भरीत-भर टाकीत जि.प. सदस्याचा एका निकटवर्तीयाने गदारोळ केल्याने त्याच्या व उपसभापती पती यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक उडाल्याने पातूर पंचायत समिती परिसरात काही काळ वातावरण चांगलेच तापले असून बघ्यांची गर्दी जमल्याने तुलंगा वासीयांच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याच्या श्रेयवादावरून वंचित चा अंतर्गत कलह पहावयास मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here