शासनानं वीज क्षेत्रात राबलवलेल्या धोरणांची अंमलबजावणी व्यवस्थित झाली नाही – एम.एस.ई.बी वर्कर्स फेडरेशन.

सांगली – ज्योती मोरे

शासनानं ज्या ज्या सबसिडी जाहीर केल्या त्या त्या वेळेला ती सबसिडीची रक्कम वीज वितरण कंपनीकडं भरली असती, तर 73 हजार कोटी इतका थकबाकीचा आकडा वाढला गेला नसता.शिवाय शासनानं वीजक्षेत्रात जी धोरणं राबवण्याचा प्रयत्न केला त्या धोरणांची अंमलबजावणी योग्य पध्दतीनं झाली नसल्यानंच हे दुष्परिणाम निर्माण झालेयत.त्यामुळं शासनानं जनता आणि विजकंपनी असं चित्र उभं करण्याऐवजी आपली येणेबाकी प्रथम भागवावी.अशी प्रतिक्रिया एम.एस.ई.बी.वर्कर्स फेडरेशनचे राज्य अतिरिक्त सरचिटणीस, कॉम्रेड महेश जोतराव यांनी, महा व्हॉईस न्यूजशी बोलताना व्यक्त केलीय.

महेश जोतराव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here