शेतकऱ्यांची फसवणूक करणारा अवैध खताचा ट्रक पोलिसांच्या ताब्यात…

गोपाल विरघट (दानापुर)

दानापुर येथे दि.१५/०६/ २०२० रोजी संध्याकाळी ४:३० वाजता तालुका कृषी अधिकारी तेल्हारा मिलिंद वानखेडे यांचे सर्तकतेमुळे हिवरखेड पो.स्टे. ठाणेदार आशिष लव्हगळे व आकाश राठोड यांचे कर्तव्य दक्षतेमुळे दानापुर बस स्टॉप जवळ

जिओग्रीन व्यापारी नावाचे
खताचे प्रती ५० कि. वजनाचे १६० बँग ज्यावर बँच क्रमांक व उत्पादन दिनांक नसून परवाना क्रमांक छपाई नसलेल्या सेंद्रीय खताचा ट्रक वाहन क्र.एम. एच. २६ एच ८१११ चालक गणेश क-हाळे रा. बोरिसावंत ता. वसमत जि. हिगोंली यासह ट्रक सहाय्यक यांनी मुद्देमालासह ट्रक व खताची अंदाजे किमंत १६,०६,५६० रू. यांचा साक्षीदार सह माल चेक करून ताब्यात घेतला सदर उत्पादन हे जिओग्रीन (Geogreen) या व्यापारि नावाचे असून

या अवैद्य उत्पादनशी संबधी आरोपी रनजीत प्रताप भंडारे रा. पुणे व मँनेजर मे. नर्मदा पोल्युशन सव्हिसेस पूर्णा सहकारी साखर कारखाना बाभळगाव ता. वसमतनगर जि. हिगोंली ट्रक चालक गणेश क-हाळे व सहाय्यक किसन सावंत रा. बोरिसावंत यांचे वर भा.द.वि. कलम ४२०/३४ खत नियत्रंण कायदा व अत्यावश्यक वस्तू कायदा अंतर्गत विविध कलमान्वे शेतक-यांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, पुढिल तपास हिवरखेड पो.स्टे. करित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here