चंद्रपूर – रुपेश देशमुख
गोंडपिपरी अवैध रित्या सुरू असलेल्या कोंबडा बाजारावर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत ७ जणांना अटक केली तर अन्य आरोपी फरार झाले. ही कारवाई रविवारी गोंडपिपरी पोलिसांनी केली असून, कोंबडे ७ दुचाकी आणि रोख रक्कम, असा एकूण २ लाख १८ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कुणाल भगवान नामेवार (४१),
रमेश पत्रुजी भोयर ( ३५) रा.वढोली ,सुखदेल कुडाजी उईके (६५), हरिचंद्र मारुती राजूरकर (५३) रा.चिंतलधाबा ता. पोंभुर्णा, रमेश गणपती दहेलकर (३५), वसंत रामूजी नैताम (५५) ,रा.चेकबेरडी, सुनील नारायण आत्राम (३९) रा.धानापूर ता. गोंडपिपरी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस मुल मलिकाअर्जुन इंगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार राजगुरू पोलीस, उपनिरीक्षक मोगरे,नापोशी गणेश पोदाडी ,जिवन आचेवार, नंदकिशोर माहूरकर, विजय पवार, यांनी केली.