आलेगावात पोलिसांचे पथसंचलन…आर,सी,पी, एस,आर,पी, पथक सामील…

पातूर – निशांत गवई

श्री गणेशोत्सव तसेच आगामी उत्सवा दरम्यान चांनी पोलिसांसह आर,सी,पी,एस,आर,पी पथकाने आलेगावा मध्ये पथसंचलन केले.

श्री गणेशोत्सव तसेच आगामी उत्सवा दरम्यान बाळापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ रोहिणी साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थिती मध्ये चांनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश वनारे,सहाय्य क पोलीस अधिकारी रामराव राठोड,एस, आर,पी पथकाचे अधिकारी सानप,आर,सी,पी चे अधिकारी व आलेगांव पोलीस चौकीचे इंचार्ज गजानन पोटे आदींच्या उपस्थिती मध्ये चांनी पोलीस अंतर्गत येत असलेल्या आलेगावामध्ये पथसंचलन करण्यात आले.

सदर पथसंचलना मध्ये अमरावतीचे एस, आर,पी,पथक व अधिकारी,पोलीस अधिक्षक यांचे आर,सी,पी,पथक तसेच चांनी पोलीस स्टेशन व आलेगांव पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी आदींनी शिवाजी चौक,बसस्थानक रोड, गुजरी पेठ, वं जारीपुरा,माळीपूरा,पाटीलपुरा आदी रस्त्याने पथसंचलन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here