रामटेक – राजु कापसे
दि 5 फेब्रुवारीला पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस पाटील कर्तव्य व अधिकार याबाबत मार्गदर्शनावार कार्यशाळा घेण्यात आली असून कार्यशाळेकरिता पोलीस उपविभागीय अधिकारी सावनेर अशोक सरबळकर यांनी प्रथम संबोधन करताना ग्राम पोलीस अधिनीयम सन 1967 बाबत माहिती देऊन पोलीस पाटीलांचे अधिकार व कर्तव्याबाबत माहिती दिली.
सदर कार्यक्रमाची प्रस्थावना केळवद पोलीस स्टेशन ठाणेदार दिलीप ठाकूर यांनी कार्यशाळेच्या प्रयोजनाचे महत्व पटवून देत पोलीस पाटील हा गाव व पोलीस याचे मधील दुवा असून गाव पातळीवर कायद्याची अमलबजावणी करताना महत्वाचा घटक असल्याचे सांगितले तसेच पोलिसांना आपले काम करताना गावात घडण्यारा घडामोडीची माहिती देऊन गावात शांतता व सुव्यस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस पाटलांची भूमिका हि अत्यन्त मोलाची ठरते असे संगीयले.
तसेच पोलीस पाटील संघटना परशिवनी अध्यक्ष दीपक पालिवाल यांनी पोलिस पाटील यांना मार्गदर्शन केले.यसेच महाराष्ट्र राज्य गाव कामगार पो.पा.संघटनेचे अध्यक्ष जिल्हा वर्धा रमेश ठोकने यांनी सर्व पोलीस पाटील यांना पोलीस पाटील म्हणून काय काम करावे ,काय करू नये,गावात घडणारे महत्वाचे गुन्हे,गावात आलेले फिरस्ते साधु यांची नोंदी ठेवणे,हिंदू-मुस्लिम वाद,राजकीय पशातील वाद,व अनेक अश्या ज्यांच्यामुळे कोणतीही घटना नाही घडू असे,
समाजविघातक प्रवृत्तीना कसा आळा घालावा गावात शांतता सुव्यस्था बाधा असण्यारा आप पृवृत्तीचा कसा बंदोबस्त करावा तसेच गावात शांतता व सुव्यस्था अबाधित ठेवण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात इत्यादी माहिती देऊन पोलिसपटलना मार्गदर्शन केले.सदर कार्यशाळेत पोलीस स्टेशन देवळी जिल्हा वर्धा अन्यर्गत असलेले पोलीस पाटील ऋषिकेश राऊत,अरविंद कामळे,सचिन वडसकर, जनार्दन भगत,सुभाष बोबडे हजर होते.