पाच हजाराची लाच स्वीकारताना पोलीस कर्मचाऱ्यास लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले…

महेंद्र गायकवाड
नांदेड – भावावर दाखल झालेल्या गुन्हयात मदत व जमीन करण्यासाठी तक्रारदाराकडून लाच मागणार्‍या एका पोलिस कर्मचार्‍यास 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवार दि. 3 मे रोजी रंगेहात पकडले असून त्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक शाम अर्जुनराव काळे हे एका गुन्हयातील आरोपीस मदत करण्यासाठी व जामीन करण्यासाठी वाजेगाव येथील तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपयाची मागणी केली होती.

या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार वाजेगाव चौकात बुधवारी दुपारच्या सुमारास सापळा लावला असता तक्रादाराकडून लाच स्वीकारताना वाजेगाव पोलीस चौकीत पोलीस नाईक काळे

Also Read: अहमदपूर येथे स्व.गोपिनाथराव मुंडे यांची पुण्यतिथी साजरी…

यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधिकारी व कर्मचार्‍याच्या पथकाने रंगहात पडकले. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपी काळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक कल्पना बोराळकर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस उप अधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक राहुल पखाले, पो.कॉ.बालाजी तेलंगे, हणुमंत बोरकर,गणेश तालकोकुलवार, सचिन गायकवाड, नरेंद्र बोडके यांच्या पथकाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here