खगोलशास्त्राचा छंद जोपासणारे पोलीस (S.R.P.F.) जवान…हौशी खगोल अभ्यासक…

स्मिता ठाकरे,अमरावती

जगात अनेक छंद जोपासणारे लोक असतात. त्यापैकीच एक आगळा-वेगळा छंद जोपासणारे पोलीस कर्मचारी म्हणजे विजय गिरुळकर.यांना खगोलशास्त्राचा व त्या माध्यमातून दुर्बिनीतून आकाश निरीक्षण करण्याचा छंद आहे. गिरुळकर हे एस.आर.पी.एफ. गट क्र. ९ अमरावती येथे आरमोरर वर्कशॉप येथे असिस्टंट सब-इन्स्पेक्टर (A.S.I.) या पदावर कार्यरत आहे.

आपली नोकरी बरी व आपण बरे असे न करता विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्राची आवड निर्माण करण्यासाठी ते स्वखर्चाचे झटत आहे. त्यांचे खगोलशास्राचे ज्ञान तज्ञाला सुद्धा लाजवित आहे. १ ९ ८३ मध्ये त्यांनी दाभा (पहुर) जि. यवतमाळ येथील पी.सी.एल. हायस्कूल मधून मॅट्रीकची परीक्षा पास केली नंतर नागपूर येथून इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड रेडियो हा एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स केला.

नंतर १ ९ ८७ मध्ये ते एसआरपी मध्ये भर्ती झाले. गिरुळकर यांनी लहानपणापासूनच खगोलाचा अभ्यास करण्याचे स्वप्न उराशी बाळगुन जगापेक्षा आपण एका वेगळ्या
विश्वात जगू शकतो हा संकल्प ठेवला. भाष्करराव परडखे नामक शिक्षकाकडून व प्रविण गुल्हाणे कडून विज्ञानाचे व खगोलशास्राचे धडे घेऊन आपल्या जीवनाची वाटचाल सुरु केली. त्यांच्याकडे आज ३ इंच व्यासाची दुर्बिन आहे.

खगोलशास्त्र, विज्ञानाच्या पुस्तकाचा व विज्ञान मासिकांचा बराच मोठा संग्रह आहे. ते विज्ञानाचे व खगोलशारखाचे पुस्तके जिज्ञासूंना व विद्यार्थ्यांना विनामुल्य वाचावयास देतात. स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी स्वतः काढलेल्या भूगोल व जी.के. या विषयाच्या नोट्स आहेत. कोणत्याही खगोलीय घटना संदर्भात ते वृत्तपत्रातून नियमित बातम्या प्रकाशित करतात.

त्यामुळे जिज्ञासूंना सर्व खगोलीय घटनांची माहिती वेळोवेळी मिळते. गिरुळकर हे अमरावती शहरातील व परिसरातील शाळा, कॉलेज, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र यांना नियमित भेटी देतात व खगोलशास्त्रावर मार्गदर्शन करतात. स्लाईड शो दाखवितात, ग्रहताऱ्याविषयी व ग्रहणासंदर्भात ज्या समाजाच्या अंधश्रद्धा आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करतात व दुर्बिनीतून रात्रीच्या वेळी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आकाश दर्शन करवितात.

या कार्याची दखल घेऊन मराठी विज्ञान परिषद अमरावतीने फेब्रुवारी २०० ९ मध्ये त्यांना सन्मानपत्र देऊन गौरव केला. अमरावती विद्यापीठात ज्यावेळी खगोलशारसंशोधन केंद्र सुरु झाले त्यावेळी तज्ञ कमेटीत त्यांची नेमणूक झाली होती. २२ जुलै २०० ९ रोजी झालेल्या खग्रास सूर्यग्रहणाचा त्यांनी सुरत (गुजरात) येथे जाऊन प्रत्यक्ष अभ्यास केला. २००८ मध्ये शनीग्रह पृथ्वीच्या प्रतलात आला असल्याने या ग्रहाचे सुध्दा त्यांनी वर्षभर दुर्थिनीतून निरीक्षण व अभ्यास केला.

१५ जानेवारी २०१० रोजी झालेल्या कंकणाकृती सूर्यग्रहणाचा ग्रहणपट्ट्यात कन्याकुमारी येथे जाऊन त्यांनी अभ्यास केला. हे ग्रहण १२० वर्षानंतर दिसलेहोते. ग्रहण काळात प्राणी, वनस्पती व पक्षी यांच्या हालचालीवर काय परिणाम होतो, ग्रहण काळात तापमानात काय बदल होतो या संदर्भात त्यांनी विशेष अभ्यास केला. ६ जून २०१२ रोजी झालेल्या शुक्र अधिक्रमणाचा त्यांनी विशेष अभ्यास केला. पुढील शुक्र अधिक्रमण १०५ वर्षांनी होणार आहे.

समाज विज्ञाननिष्ठ व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन यावा, ग्रहताच्याविषयी समाजामध्ये ज्या अंधश्रध्दा आहेत त्या दूर व्हाव्यात. खरं खगोलशास्व लोकापर्यंत जावं याकरीता अशा उपक्रमांची नितांत आवश्यकता आहे. ज्ञान मिळवून बंदीस्त ठेवणाऱ्या विद्ववानापेक्षा गिरुळकर हे एसआरपी चे पोलीस जवान थोर आहे. गिरुळकर हे पोलीस कर्मचारी असूनही शिक्षकासाठी आदर्श ठरत आहे. गिरुळकर हे हौशीखगोल अभ्यासक म्हणून अमरावती शहरात व परिसरात प्रसिद्ध आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here