कत्तलखान्यात जाणाऱ्या ३८ गोवंशांना पोलिसांनी दिले जीवदान, दोन आरोपीस १३ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त…

देवलापार-पुरुषोत्तम डडमल

आज शनिवार दि.१५ जानेवारी रोजी पोलीसांना खबरीलाल कडून गुप्त माहिती मिळाली की,खवासा टोल पार करून एक कंटेनर ट्रक गोवंश भरून देवलापारच्या दिशेने येत आहे. या खबरी वरून देवलापार पोलिसांनी निमतोला चौक येथे कंटेनर थांबविणेसाठी नाकाबंदी केली.

कंटेनर क्रमांक एम एच ४०/बी.जी.९५७८ ला पोलिसांनी थांबविण्याचा ईशारा केला परंतू कंटेनर चालकाने ट्रक न थांबविता ब्यारिकेट उडवून पळ काढला असता पोलिसांनी ट्रकचा पाठलाग करून पोलीस स्टेशन जवळ थांबविला असता आरोपी चालक.

मुस्ताक फिरोज अली खान(२४) राहणार १)राना भोईपूरा कामठी हा पोलिसांना धक्का देवून पळत असतानाचत्यांना पकडले २)सलीम शहीद खान(२७) राहणार सालई जि.सिवनी या आरोपीने ही पोलीस कर्मचाऱ्यास हिसका देऊन ब्यारिकेट्स वरून उडी मारून डोंगराल रस्त्याकडे पळाला त्याचा पाठलाग करत असताना आरोपीने पोलिसांचे दिशेने दगड भिरकावला परंतू कोणालाही इजा झाली नाही. त्यालाही पोलिसांनी मोठया शिताफीने पकडले.

सदर कंटेनर क्रमांक एम एच-४०/बी. जी.९५७८ची पोलिसांनी तपासणी केली असता त्यांना वाहनात गोवंशाना निर्दयपणे आखूड दोराने बांधून कोंबलेल्या अवस्थेत आढळून आले.त्यामुळे पोलिसांनी वाहनाला ताब्यात घेतले.त्यात ३८गोवंश आढळून आले.

३१ गायी तर ७ बैलाचा समावेश आहे.गोवंशाची किंमत ३ लाख ८० हजार तर कंटेनर ट्रक असा एकूण १३ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.आरोपी विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. सदर गोवंश चारा, पाणी व देखभालीसाठी गो विज्ञान अनुसंधान केंद्रात सुखरूप पोहचविण्यात आले.

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक,विजयकुमार मगर,अपर पोलीस अधीक्षक,राहुल माकनिकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार प्रविण बोरकुटे,पोउपनि केशव पुंजरवाड,राकेश नालगुंडवार,सचिन डायलकर, शिवचरण नागपुरे यांनी केली.सदर घटनेचा पुढील तपास ठाणेदार प्रवीण बोरकुटे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here