दर्यापुरात पोलिसांची जुगार अड्ड्यावर धडक कार्यवाही; ४ लाख रुपये चा मुद्देमाला सह :- ९ आरोपी वर कार्यवाही…

दर्यापूर – किरण होले

दर्यापूर शहरातील आठवडी बाजार परिसराला लागून असलेल्या चंद्रभागा नदीकाठी काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती दर्यापूर पोलिसांना मिळाली त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकून 9 आरोपीना जुगार खेडताना रंगेहात पकडले होते पर्यंत यातील तीन आरोपी फरार झाले.

आरोपींकडून या कारवाई दरम्यान पोलिसांना घटनास्थळावर नगदी 19540 रुपये तसेच 40 हजार किमतीचे 5 मोबाईल,लाख 50 हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी ऐकून 40 लाख 10 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

यामध्ये आरोपी 1. वैभव संजय कपिले ,2. जयेश भगवंत सोनावडेकर ,3. गजानन हरीराम खरुले ,4. सागर अरुण बन्सी ,5. सुशील उत्तमराव गुरुमाळे,6. यश अनु गुल्हाने, 7. श्याम विल्हेकर फरार, 8. अजय धुमाळे फरार,9. सय्यद शहाबाज सय्यद जाफर फरार सर्व राहणार तो दर्यापूर या 9 ही आरोपींवर मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई ठाणेदार प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनात नवनाथ खेडकर, बजरंग इंगळे, विनोद पवार, खुपीया शरद सारसे, सागर नाथे, आदींनी केली आहे . पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे दर्यापूर आतील जुगार खेळणाऱ्यांची चांगलेच धाबे दणाणले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here