कर्नाटकचे अतिरिक्त पोलिस महासंचालक भास्कर राव यांची कोगनोळी सीमा तपासणी नाक्याला भेट…

राहुल मेस्त्री

महाराष्ट्रात करोणाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याकारणाने कर्नाटक शासनाने कोगनोळी तालुका निपाणी येथे कर्नाटक महाराष्ट्र आंतरराज्य सीमेवर सीमा तपासणी नाका उभारला असून यामध्ये महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनधारकांना rt-pcr बंधनकारक केले आहे. या सीमा तपासणी नात्याला कर्नाटक प्रशासनातील मोठ मोठे अधिकारी भेट देत असतात.

काल जिल्हाधिकारी के हरीश कुमार यांनी भेट दिली असून आज दिनांक 23 रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान कर्नाटक राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक भास्कर राव यांनी कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आणि योग्य त्या सूचना दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निम्बर्गी ,चीक्कोडी पोलीसउपअधिक्षक मनोज कुमार नायक ,उपअधीक्षक एन पुष्पलता उपस्थित होत्या.

यावेळी अतिरिक्त पोलिस महासंचालक भास्कर राव यांनी आशा कार्यकर्ता यांना मास्कचे वितरण केले. भास्कर राव माध्यमांशी बोलताना म्हणाले उन्हाच्या तडाख्यात देखील येथील वैद्यकीय अधिकारी आणि आशा कार्यकर्त्या आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असून सदर काम हे तीन शिफ्टमध्ये होत आहे. त्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले.

कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी हा सीमा तपासणी नाका महत्त्वाचा असून याठिकाणी प्रामाणिक काम होणे महत्त्वाचे आहे. कारण याच सीमा तपासणी नाक्यावरुन कर्नाटक राज्यात अनेक नागरिकांचा प्रवेश होतो. असे मनोगत व्यक्त केले. यावेळी विजापूर रेल्वे पोलीस निरीक्षक डी बी पाटील, निपाणी शहर उपअधीक्षक अनिल कुंभार,

उपनिरीक्षक सत्यापा आय एम, सहाय्यक फौजदार टोलगी,बीट हवलदार राजू गोरखणावर,वैद्यकीय अधिकारी हुंडेकर ,आशा कार्यकर्त्या अश्विनी खोत ,सुरेखा कागले ,संगीता मंजुळकर यांच्यासह अनेक पोलिस अधिकारी उपस्थित होते.यावेळी अतिरिक्त पोलिस महासंचालक भास्कर राव यांनी दूधगंगा नदी काठी जाऊन कर्नाटक महाराष्ट्र आंतरराज्य सिमेची पहाणी केली.

शेवटी चहा पाण्याच्या कार्यक्रमात या सीमा तपासणी नाक्यावर कोरोना योद्धे म्हणून आपले कर्तव्य बजावत असणारे वैद्यकीय अधिकारी आणि आशा कार्यकर्त्या यांना राज्याचे अतिरिक्त पोलीस प्रमुख असून देखील आदराने चहा पिते वेळी बिस्किट देऊन त्यांची मने जिंकली व मनोबल वाढवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here