पिस्टलचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी केले दोन तासात जेरबंद…आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई करणार…जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर

महेंद्र गायकवाड
नांदेड
पिस्टलचा धाक दाखवून व्यापाऱ्यांस लुटल्या प्रकरणी तीन आरोपीना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी पत्रकार परिषदेत दिली


या पत्रकार परिषदेला अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे द्वारकादास चिखलीकर, रामतिर्थचे सोमनाथ शिंदे यांची उपस्थिती होती. सुनील पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे द्वारकादास चिखलीकर, रामतिर्थचे सोमनाथ शिंदे यांची उपस्थिती होती.

सविस्तर वृत्त असे की ,बिलोली तालुक्यातील कासराळी संजय व्यंकटेश उपलंचवार (अडत व्यापारी ) यांचे श्री व्यंकटेश ट्रेडींग कंपनी नावांचे आडत दुकान असुन सदर आडत दुकानात मुनिम म्हणुन आनंदा बाजीराव आडबलवार रा बेळकोणी खु हा काम करतो.

दिनांक ३१/५/२०२० रोजी सदर व्यापाऱ्याने १४९ क्विटंल भुईमुग शेंग खरेदी करुन ट्रक क्रं.MH २६ H ५७४६ मध्ये मुनीम आनंदा आडबलवार ला विक्रीसाठी पिटलम (तेलंगना) येथे पाठविले असता दिनांक १/६/२०२० रोजी शेंग विक्री ची एकुण ७,२४,७००/- घेवुन त्यातील ट्रक चालकाचे भाडे ५०००/- रु काढुन उर्वरीत ७,१९,७००/- रु

घेवून त्याच ट्रकमध्ये रात्री सवानऊ वाजेच्या सुमारास पोहचला असता मुनीम यास वाहन नसल्याने त्याने व्यापारी उपलंचवार यांना बोलावून घेतले असता ते मो सा कं. MH-२६-Q/५५५० होंडा शाईन घेवुन आले.

ते सोबत पैश्याची बॅग घेवुन परत कासराळी कडे जात असतांना नरसी ते बिलोली रोड वरील लोहगांव शिवारातील खडी क्रशरच्या पुढे लोहगांवकडील बाजुस वळण रस्त्यावर पाठीमागुन एक मोटार सायकल भरधाव वेगाने येवुन त्यांचे मोटार सायकलला आडवी लावण्याने फिर्यादीने ब्रेक दाबल्याने खाली पडली तो पर्यत

भरधाव वेगात आलेल्या मो सा वरील तिनही अनओळखी ईसम मोटार सायकलवरुन खाली उतरुन दोघांचे जवळ येवन आनंदा च्या हातातील पैश्याची बॅग आनंदा यास चाक दाखवन एक जनाने हिसकावून घेतली असता फिर्यादी प्रतिकार करु लागताच दुस-याने त्याच्या हातातील पिस्टल ने फायर केला व पिस्टल ची पाठीमागील बाजु फिर्यादीचे डोक्यात मारुन मला जखमी करुन मो सा वर बसून पळुन जाण्याचा प्रयत करत असतांना

फिर्यादीने त्यांची मोटार सायकल पकडुन ठेवली तेंव्हा तिसऱ्या व्यक्तीने फिर्यादीवर हल्ला करुन लाता घातल्या त्याचवेळेस नरसी कडुन येणारे वहानाचे प्रकाश दिसताच मोटार सायकल तेथेच सोडुन फिर्यादी व साक्षीदार यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन पैश्याची बॅग हिसकावुन घेवुन आंधारात पळुन गेले. त्यानंतर सर्व प्रकार पोलीसांना फोन करुन कळविले होते.


पोलीस स्टेशन रामतिर्थ हद्दीतील बिलोली ते नरसी रोडवर लोहगांव चे आलीकडे खडी मनिशजवळ रोडवर मोटार सायकलवरील लोकांना पिस्टलचा धाक दाखवून त्यांचेकडील ७,१९,७००/- रुपये बळजबरीने हिसकावून घेवून गेल्याबाबतची तक्रार मिळाल्याने रामतिर्थ पोलीसांनी घटनास्थळी जावून पाहणी करुन त्यांचा शोध घेतला असता तीनही आरोपी हे नरसी शिवाराकडे येत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीसांनी त्यांचा पाठलाग करुन सदर आरोपींना अवघ्या दोन तासात मुद्देमालासह पकडले आहे.

पकडले आहे.आरोपी जवळ चाकू,फायर केलेली बुलेट मिळाली असून आरोपी शब्बर बेग पिता गफार बेग वय ३२ वर्षे व्यवसाय मजुरी रा ईदगाह गल्ली देगलूर नाका नांदेड सुनिल सुरेश सुळगेकर वय २० वर्षे ,मजुरी रा बंदाघाट रोड वजिराबाद नांदेड शेख मोईन शेख महेमुद वय २२ वर्षे व्यवसाय मजुरी रा बोडा रोड मिलतनगर गल्ली क्रं.०७ देगलूर नाका, याना पकडून अटक केली

असून त्यांच्यावर रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुरनं.९२/२०२० कलम ३९४,३९७ भादवि व सह कम ३/२५ ऑर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून असून सदर गुन्हयाचा तपास सोमनाथ शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पो स्टे रामतिर्थ हे करीत आहेत.


सदर कार्यवाहीत रामतिर्थ पोलीस स्टेशनचे सपोनि सोमनाथ शिंदे, पोना राठोड, ब.क्र. २१८५, पोना/बोडके ब.क्र.२५५८ व पोशि क्षिरसागर ब.क्र. २६८४ यांना आरोपी पकडण्यासाठी नरसी येथील ५-७ ग्रामस्थ व लोहगांव येथील ५ ग्रामस्थ यांनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता आरोपीला पकडण्यासाठी सहकार्य केले याआहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here