नांदेडमध्ये गोळीबार करुन लुटणाऱ्या चार गुन्हेगारांना पोलिसांनी अवघ्या काही तासात केले जेरबंद…

महेंद्र गायकवाड
नांदेड
नांदेड शहरात रविवारी जुना मोंढा भागात गोळीबार करून लुटले होते.त्यानंतर पोलिसांनी काही तासातच चार आरोपींना अटक केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.शहरात रविवारी 5 वाजेच्या वाजताच्या सुमारास राजा रणजितसिंहमार्केटमधील दुकानदारांना गुंडानी पिस्तुलाचा धाक दाखवून गोळीबार करुन लुटण्याची घटना घडलेली होती.

रणजितसिंह मार्केटमधील विजयलक्ष्मी टेक्सटाईल या दुकानामध्ये घूसुन गल्ल्यातील दहा हजार काढून पसार झाले होते. तसेच नृसिंह हॅन्डलुम शुभम कलेक्शन, कृष्णा कलेक्शन या दुकानासमोर गोळीबार केला. सदर गुंडानी केलेल्या गोळीबारात पानपट्टी चालक आकाश परिहार हा जखमी झालेला होता सदर घटनेच्या अनुषंगाने पो.स्टे. इतवारा यांनी 315/2020 कलम 395,397 भादंविसह 3,4/25 भारतीय हत्यार कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे हे करीत आहेत.

सदर घटनेमुळे नांदेड पोलिसांसमोर गुन्हेगारांचा शोध घेवून अटक करणे हे एक मोठे आव्हान होते. पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी व पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी तत्परतेने घटनास्थळी भेट देवून पथके तयार करुन आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या.सदर घटनेच्या अनुषंगाने पोलीस उप महानिरीक्षक, निसार तांबोली, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक श् विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, पोनि द्वारकदास चिखलीकर, नरवाडे, शिवले यांनी घटनास्थळावर धाव घेतली.पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी घटनेचे गांर्भीय ओळखून आरोपींचा शोध घेणेकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पथके तसेच पो.स्टे. इतवारा व वजिराबादचे गुन्हे शोध पथके (DB) तयार करुन विविध ठिकाणी पाठविण्यात आलेली होती.
पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. द्वारकादास चिखलीकर व सपोनि पांडुरंग भारती यांचे पथक तसेच पो.नि. नरवाडे, पो.स्टे. इतवारा व पोनि शिवले पो.स्टे. वजिराबाद या पो.स्टे. चे गुन्हे शोध पथक (DB) यांचे पथकांनी आरोपींचा शोध घेवून त्यातील (4) आरोपींना अवघ्या काही तासातच वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले आहे. सदर चारही आरोपी हे पोलीसांच्या ताब्यात असून सदर गुन्हयाचा तपास सुरु आहे.लवकरच उर्वरित आरोपींना अटक करण्यात येईल असे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here