चिरेखनी शेत शिवारातील दारू अड्यावर पोलिसांची धाड २ आरोपीना अटक…

गोंदिया – अमरदिप बडगे

तिरोडा तालुक्यात जिल्हा परिषद /पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक संबंधाने पोलीस निरीक्षक, पो स्टे तिरोडा दिनांक 03 डिसेंबर ला पो स्टे परिसरात पेट्रोलिंग करीत असताना.गुप्त सूत्रधार कडून मिळालेल्या माहितीनुसार चिरेखनी शेत शिवारात नाला चे काठावर काही इसम अवैध रित्या गॅस शेगडी वरमोहफुलाची दारू काढत आहेत.

या मिळालेल्या माहितीव्दारे पोलीस कुमक बोलावून मोक्यावर जाऊन छापा टाकले असता. यामध्ये नामे पूर्णा प्रल्हाद तांडेकर वय 52 वर्ष रा. संत रविदास वॉर्ड तिरोडा ह. मु. चिरेखनी, कुलदीप अनंतराम भोयर वय 41 वर्ष रा. नेहरू वॉर्ड तिरोडा हे गॅस शेगडी वर मोहफूल दारू काढताना मिळून आलेत.मोक्यावरून प्रशांत नेवारे रा. नेहरू वॉर्ड तिरोडा हा पळून गेलेला आहे. त्यांच्या जवळून एकूण 145 प्लास्टिक चुगडीत 580 किलो सडवा मोहाफुल किं. 1, 85, 600/- रुपये.
2 लोखंडी गॅस शेगडी किं, 2000/-रुपये,
3 गॅस हंडे किं. 9000/-रुपये

2 रेग्युलेटर किं. 1000/- रुपये,2 नग जर्मन घमेले किं 2000/- रुपये,
2 नग लाकडी टवरे किं 2000/- रुपये,
2 लोखंडी ड्रम किं. 2000/- रुपये,
90 लिटर मोहा दारू किं. 9000/-रुपये,

असा एकूण 2, 12, 600 /- रुपये चा मुद्धेमाल जप्त केलेला आहे. वरील आरोपी विरुद्ध कलम 65(ब )(क )(ड )(इ )(फ ) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असुन सदरची कार्यवाही मा. नितीन यादव, उप विभागीय पोलीस अधिकारी तिरोडा यांचे मार्गदर्शन खाली योगेश पारधी,

पोलीस निरीक्षक पो स्टे तिरोडा यांनी सोबत नापोशी रकसे, पोशी शेंडे, विदेश अंबुले, चालक पो शी प्रशांत काहलकर, महिला पोशिं अभिलाषा राऊत यांनी केलेली आहे. अश्या प्रकारे अवैध दारू /जुगार बाबत कोणालाही माहिती मिळाल्यास आम्हाला कळवावे. आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल. असे तिरोडा पोलीसांनी आव्हान केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here