महामार्गावर गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतुसांच्या विक्रीवर पोलिसांची कारवाई…

आरोपिकडून आठ गावठी बनावटीच्या दोन पिस्तुल आणि आठ जिवंत काडतुसे जप्त…

मनोर – मुबंई – अहमदाबाद महामार्गावर हालोली गावच्या हद्दीत समिरा हॉटेलच्या पार्किंगमध्ये अवैध शस्त्रास्त्र विक्री प्रकरणी गुरुवारी मनोर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. आरोपी सुशांत सुनील सिंनर (वय.25) याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून दोन गावठी बनावटीचे पिस्तूल आणि आठ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.याप्रकरणी मनोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई अहमदाबाद महामार्गावर हालोली गावच्या हद्दीत गावठी पिस्तुल आणि शस्त्रास्त्र विक्री होणार असल्याची माहिती मनोर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी पोलिसांनी समीरा हॉटेलच्या पार्किंग मध्ये एका संशयित इसमाची झडती घेतली असता, त्याच्याकडे दोन गावठी बनावटीचे पिस्तुल आणि आठ जिवंत काडतुसे आढळून आली.

याप्रकरणी आरोपी सुनील सिंग याला अटक करण्यात आली असून मनोर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3, 25 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालघरचे उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनात केलेल्या कारवाईत मनोरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रताप दराडे आणि मनोर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here