बार्टी संस्था यांच्या वतीने दर्यापूर नगर परिषद क्षेत्रामध्ये ८० झाडांचे वृक्षारोपण…

मुख्याधिकारी यांची उपस्थिती

दर्यापूर :- ( किरण होले)

लाहुया रोपे करुनी संवर्धन ,मिळेल प्राणवायू जपुया पर्यावरण” सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी) यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिननिमीत्त मा.धम्मज्योति गजभिये बार्टी महासंचालक यांच्या संकल्पनेतुन वृक्षारोपण पंधरवडा या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले कोविड 19चा निर्बंधाचे पालन करून संपूर्ण महाराष्ट्रात व राज्यात पंधरवडा अभियान राबविण्यात येत आहे .

याचं अंतर्गत कु.पूजा गौतम व भावना वासनिक यांनी विजय वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली दर्यापूर नगरपरिषद क्षेत्रामध्ये आज तब्बल ऐंशी झाडांचे वृक्षारोपण मुख्याधिकारी गीता वंजारी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. व तालुक्यात विविध ठिकाणी अशाच प्रकारे वृक्षारोपण सुरू असल्याची माहिती बार्टी संस्था च्या पूजा गौतम यांनी दिली आहे. नगरपंचायत येथे वृक्षारोपण वेळी उपाध्यक्ष सागर गावंडे, नगरसेवक असलम घानीवाले, बागडे सर, आधी नगर परिषद कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here