पिंपरी – चिंचवड चे राष्ट्रवादी कॉंग्रेस आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर भरदुपारी झाडल्या गोळ्या…..बालंबाल बचावले…

पिंपरी : 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पिंपरी मतदारसंघातून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर आज भरदिवसा गोळीबार करण्यात आला आहे. ही घटना आज दुपारी एक वाजताच्या सुमारास चिंचवड स्टेशनजवळील त्यांच्या कार्यालयाजवळ घडली. आरोपीने पिस्तुलातून चार गोळ्या झाडल्या आहेत.तानाजी पवार असे संशयित आरोपीचे नाव असल्याचे समजते.

पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड स्टेशनजवळ आमदार अण्णा बनसोडे यांचे कार्यालय आहे. त्याच परिसरात एका व्यक्तीने बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास पिस्तुलातून गोळी झाडली. या घटनेत कुणीही जखमी झाले नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून या घटनेत वापरण्यात आलेले पिस्तुल देखील जप्त करण्यात आले आहे.अलीकडील काळात गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र आज थेट लोकप्रतिनिधीवरच भरदिवसा गोळीबार करण्यात आल्याच्या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे.याप्रकरणी पोलिसांनी आपला तपास सुरू केला असून या तपासानंतरच गोळीबारामागील नेमकं खरे कारण कळू शकणार आहे.

अण्णा बनसोडे यांनी 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांचा पराभव करीत विजय मिळविला होता. अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळचे मानले.

अण्णा बनसोडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन करीत सोशल मिडीयावर एक संदेश टाकला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here