नांदेड – महेंद्र गायकवाड
बिलोली शहरातील झोपडपट्टी भागातील एका मूकबधिर मुलीवर शारीरिक अत्याचार करून तिचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना 9 डिसेंबर रोजी घडली होती या प्रकरणी मुलीच्या चुलत भावाने दिलेल्या फिर्यादीवरून बिलोली पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल असल्याने या प्रकरणी अनेक मोर्चे निघाले होते.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांच्या टीमनी विविध भागात आरोपींचा शोध घेण्यासाठी यंत्रणा लावली होती त्यानुसार दोन आरोपीस ताब्यात घेतले असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
बिलोली शहरातील झोपडपट्टी येथे राहणारी एक मूकबधिर 27 वर्षीय युवती दिनांक 9 डिसेंबर रोजी सांयकाळी घरात शौचालय नसल्याने शौचासाठी जवळील जिल्हा परिषदेच्या पाठीमागे गेली असता आरोपींनी तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिच्यावर शारीरिक अत्याचार करून करून तिचा दगडाने ठेचून खून केला.या प्रकरणी मयत मुलीच्या चुलत भाऊ दयानंद कुडके याने दिलेल्या फिर्यादी वरून बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे होता.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक शिवाजी अण्णा डोईफोडे यांच्या कडे आहे.परंतु या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सदर गुन्ह्याचे फिर्यादीमध्ये संशयीताचा उल्लेख केल्याप्रमाणे आरोपीस ताब्यात घेण्यात आले होते.
गुन्ह्यात इतर आरोपींचा सहभाग असल्याचे शक्यता असल्याने दिनांक 10 डिसेंबर 2020 रोजी पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी परिक्षेत्र नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी सहा टीम तयार करण्यात आल्या होत्या सदरील टीमने आरोपींचा शोध तेलंगणा राज्यातील निजामाबाद,
कामारेड्डी, निर्मल तसेच परभणी जिल्ह्यातील पूर्णा नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद,उमरी, मुदखेड, हिमायतनगर भागात कसून शोध घेतला होता.गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीस गुन्ह्यात 11 जानेवारी रोजी अटक करून त्यांच्याकडून उपयुक्त माहिती हस्तगत करून गुन्ह्यातील इतर सहभागी आरोपी निष्पन्न करून दुसऱ्या आरोपीस 13 जानेवारी रोजी ताब्यात घेतले आहे.
तसेच सदर गुन्ह्यातील तिसरा आरोपी फरार असल्याने त्याचा शोध टीम मार्फत चालू असल्याचे पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी सांगितले.गुन्ह्यात ऑट्रासिटी कलम वाढ झाल्याने सदर गुन्ह्याचा तपास सिद्धेश्वर धुमाळ उपविभागीय पोलिस अधिकारी बिलोली हे करीत आहेत.
पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या सूचनेप्रमाणे तपासीक अधिकारी डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे,पो.नि स्थानिक गुन्हे शाखा द्वारकदास चिखलीकर, सपोनि भारती, सपोनि मुतेपोड, सपोनि केंद्रे, सपोनि पठाण, सपोनि परगेवार,
पो उप नि सय्यद, पो उप नि झाकीकोरे, तसेच अंमलदार कोत्तापल्ले,नरावाड, आचेवाड,कर्णे,शिवणकर,झेलेवाड,सोनकांबळे ,यांनी गुन्ह्यातील उपयुक्त माहिती मिळविण्याकरिता करता तसेच आरोपीचा शोध घेणे कामी परिश्रम घेतले आहे.सदर गुन्ह्यातील आरोपी अटक केल्याने संपूर्ण टीमचे अभिनंदन होत आहे.